Top News विधानसभा निवडणूक 2019

सुन्नी वक्फ बोर्डाकडून सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं स्वागत

नवी दिल्ली | वादग्रस्त जागा रामलल्लाला बहाल करण्यात आली आहे. तसेच ट्र्स्ट बनवून मंदिर बनवा, असा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सुन्नी वक्फ बोर्डाकडून सुप्रीम कोर्टाच्या या निकालाचं स्वागत करण्यात आलं आहे.

बाबरी मशीद रिकाम्या जागेवर बांधली गेली नव्हती, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. खोदकामानंतर पुरातत्व विभागानं केलेल्या दाव्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सर्वेाच्च न्यायालय याकडे पुरावे म्हणून पाहतं, असं न्यायालयाने म्हटलं आहे.

संपूर्ण 2.77 एकर जमीन राम लल्लाची आहे. वादग्रस्त जागेची वाटणी होणार नाही. तसेच सुन्नी वक्फ बोर्डाला अन्यत्र 5 एकर जमीन देणार असल्याचं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे.

दरम्यान, इंग्रजांपूर्वी हिंदू चबुतरा पूजा करत होते. हिंदूंचा दावा खोटा नाही. 1856 पूर्वीही हिंदू आत पूजा करत होते. पूजा थांबवल्यानं बाहेर चबुतरा बांधला. इंग्रजांनी विभाजनासाठी रेलिंग बनवले होते, असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या