योगी सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं; पत्रकार प्रशांत कनोजिया यांची सुटका करण्याचे आदेश

योगी सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं; पत्रकार प्रशांत कनोजिया यांची सुटका करण्याचे आदेश

नवी दिल्ली | पत्रकार प्रशांत कनोजिया यांच्या अटकेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेशच्या योगी सरकारला फटकारलं आहे. प्रशांत कनोजिया यांची तातडीने सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने  दिले आहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात ट्वीट केल्याप्रकरणी पोलिसांनी पत्रकार प्रशांत कनोजिया यांना अटक केली होती.

प्रशांत कनोजिया यांच्या अटकेविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. ट्वीट केलं म्हणून अटक करण्याची काय गरज होती? असा सवाल सुप्रिम कोर्टाने विचारला आहे.

दरम्यान, जेव्हा मुलभूत अधिकारांच उल्लंघन होतं. तेव्हा आम्ही डोळेझाकपणा करू शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

विधानसभेला राज्यात महायुतीच्या ‘इतक्या’ जागा निवडून आणण्याचा सुधीर मुनगंटीवारांचा निर्धार

-दहावीच्या परिक्षेत साताऱ्याच्या जुळ्या भावांना जुळीच टक्केवारी

-…नाहीतर मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढणार- राजू शेट्टी

-अर्थमंत्रीपदाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर निर्मला सितारामण यांचा ‘हा’ मोठा निर्णय!

-आमचं सरकार येऊ द्या… सर्व रिक्त जागा भरून काढतो- अजित पवार

Google+ Linkedin