मनोरंजन

सुप्रिया पिळगावकर यांनी शेअर केला विशीतला फोटो, आताच्या अभिनेत्रींना लाजवेल असं सौंदर्य

मुंबई |  जगभरात कोरोनाने अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालीये. जगातल्या बहुतांशी देशात सध्या लॉकडाऊन आहे. भारतात पहिला लॉकडाऊन संपल्यानंतर 3 मे पर्यंत आता दुसरा लॉकडाऊन आहे. त्यामुळे सध्या सगळे लोक आपापल्या घरी आहेत. कुणी आपापले छंद जपत आहेत तर कुणी जास्तीत जास्त सोशल मीडियावर अ‌ॅक्टीव्ह आहे. अशातच सोशल मीडियावर विशीतले फोटो पोस्ट करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनी त्यांचा विशीतला फोटो शेअर केला आहे.

अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनी विशीतले तीन फोटो शेअर केले आहेत. हे फोटो एवढे सुंदर आहेत की आजच्या अभिनेत्रींना देखील विसरायला लावू शकतील. ड्रेसमधले फोटो सुप्रिया यांनी पोस्ट केले आहेत.

सुप्रिया पिळगावकर यांचा जन्म 1967 साली मुंबईत झाला. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरूवात मालिकेतून केली. 1985 साली त्यांचा विवाह प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांच्याशी झाला. त्यांची खास अशी लव्हस्टोरी देखील आहे. अशी ही बनवाबनवी, नवरा माझा नवसाचा, माझा पती करोडपती अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केलं.

सुप्रिया आणि सचिन यांना एक मुलगी आहे. श्रिया पिळगावकर असं तिचं नाव आहे. ती देखील सिने इंडस्ट्रीमध्ये आहे. एकुलती एक या मराठी चित्रपटामधून तिने मराठीमध्ये पदार्पण केलं.

 

View this post on Instagram

 

Only portfolio shot in 1993 !

A post shared by Supriya Pilgaonkar (@supriyapilgaonkar) on

 

ट्रेंडिंग बातम्या-

गेहलोत सरकारचा मोठा निर्णय; 5 कोटी लोकांना वाटणार मोफत गहू

अवकाळी पावसाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना शासनाचा दिलासा; दिले पंचनामे करण्याचे आदेश

महत्वाच्या बातम्या-

बारामतीत भिलवाडा पॅटर्न मग जामखेडला का नाही?; राम शिंदे यांचा सवाल

कोरोनाला घाबरवण्यासाठी टिकटॉकवर बनवलं गाणं, आतापर्यंत ५ कोटी लोकांनी पाहिलं!

गुजरातमध्ये कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढली; महाराष्ट्रापाठोपाठ गुजरातचा नंबर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या