Top News

“एनडीए आघाडीवर दिसत असली तरी येत्या काही तासांमध्ये हे चित्र पुन्हा पालटू शकतं”

पाटणा | मतमोजणीत सध्या भाजपप्रणित एनडीए आघाडीवर दिसत असली तरी येत्या काही तासांमध्ये हे चित्र पुन्हा पालटू शकते. आतापर्यंतच्या माहितीनुसार बिहार विधानसभेच्या 40 जागांवर उमेदवारांमध्ये केवळ 1000 मतांचा फरक आहे, असं काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी म्हटलं आहे.

काही जागांवर हा फरक 500 मतांपेक्षाही कमी आहे. त्यामुळे पुढच्या काही तासांमध्ये महागठबंधन पुन्हा आघाडीवर येईल, असा दावा सुप्रिया श्रीनेत यांनी केला आहे.

सध्याच्या घडीला एनडीए जवळपास 127 तर महागठबंधन 104 जागांवर आघाडीवर आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रिया श्रीनेत यांनी ‘आज’तक’ वृत्तवाहिनीशी संवाद साधला.

इतक्या लवकर निवडणुकीच्या निकालावर भाष्य करणे चुकीचं ठरेल. अनेक जागांवर दोन उमेदवारांच्या मतात माफक फरक आहे. त्यामुळे हे चित्र नक्की पालटेल, असं सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

“अर्णब भारतीय प्रसारमाध्यमांचा मंडेला होईल, महात्मा गांधींप्रमाणेच अर्णबला त्रास दिला जातोय”

“लालू यादव आणि काँग्रेसचं गुंडाराज बिहारच्या जनतेने नाकारलंय”

“भाजप दिवाळी साजरी करत नाही, तर जनतेला दिवाळखोरीत काढतं”

भाजप बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरण्याची चिन्हं!

“बिहार निवडणुकांतील यश आणि विजय देवेंद्र फडणवीसांमुळे”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या