शरद पवारांनी ‘बुद्धी’बळावर लेकीला आणि नातीला हरवलं; चाणाक्ष साहेबांनी इथंही थांगपत्ता लागू दिला नाही…!
मुंबई | सध्या कोरोना विषाणूच्या धास्तीने सगळ्यांनाच घरी बसणं कर्मप्राप्त झालंय. याला राजकारणी देखील अपवाद नाहीयेत. राष्ट्रवादीचे अध्यश्र शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे घरात बसून आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. आज बाप-लेक आणि नातीमध्ये बुद्धीबळाचा डाव रंगला पण चाणाक्ष पवारांनी बुद्धीबळाच्या पटावरही लेकीला आणि नातीला थांगपत्ता लागू दिला नाही.
सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर पवारांबरोबर बुद्धीबळ खेळत असल्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये स्वत: सुप्रिया सुळे, त्यांची मुलगी रेवती सुळे आणि शरद पवार बुद्धीबळ खेळण्यात दंग झालेले दिसून येत आहेत.
बाबांसोबत बुद्धीबळाचा डाव खेळणं सोपं नसतं. अगदी काही वेळातच त्यांनी आम्हा माय लेकींनी दोघींनाही हरवलं, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. राजकारणात भल्या भल्या दिग्गजांनाही पवारांच्या माईंड गेमचा थांगपत्ता लागत नाही. आज प्रत्यक्षात खेळाच्या पटावर त्यांच्या मुलीलाही हाच अनुभव आला.
दरम्यान, कोरोनामुळे पवार कुटुंब घरात बसून लोकांमध्ये जनजागृती करत त्यांनाही घरीच राहण्याचं आवाहन करत आहेत. स्वत: पवार आणि सुप्रिया सुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना विविध आवाहनं करत आहेत.
बाबांसोबत बुद्धीबळाचा डाव खेळणं सोपं नसतं. #CoronavirusLockdown मुळे आम्ही सर्वजण घरात आहोत.आम्ही दुपारी बुद्धिबळाचा डाव मांडला.थोड्या वेळातच बाबांनी आम्हा मायलेकींना हरवलं.आम्ही पुस्तकं वाचतोय,कुटुंबासोबत वेळ घालवतोय.तुम्हीही घरीच असा, सुरक्षित राहा. – #StayHomeStaySafe pic.twitter.com/i6PnMJp1hy
— Supriya Sule (@supriya_sule) March 24, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
महाराष्ट्राला दुसरं मोठं यश; मुंबईतील 12 रुग्ण कोरोनामुक्त
“…तर देशातील कोरोनाग्रस्तांचा अपेक्षित आकडा 62 टक्क्यांनी कमी होईल”
महत्वाच्या बातम्या-
कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी 15 हजार कोटींचं पॅकेज- नरेंद्र मोदी
…तर भारताला खूप मोठी किंमत चुकवावी लागेल; पंतप्रधान मोदींचा इशारा
Comments are closed.