बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तर मी स्वत: त्याचा हात तोडून त्याच्या हातात देईन”

मुंबई | पुण्यात सोमवारी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. यावेळी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.

सध्या त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याचा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निषेध केलाय.

पुन्हा कोणत्या महिलेवर पुरूषाने हात उचलला तर मी स्वत: त्याचा हात तोडून त्याच्या हातात देईन. कोर्टात जाईन केसही लढवेन, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं. कोणत्याही परिस्थितीत एक पुरुष महिलेला मारहाण करतो हे अजिबात स्वीकारार्ह नाही. या अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्यात.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे पुणे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांना फोन करुन संबंधित प्रकरणाची माहिती घेतली तसेच कार्यकर्त्यांची विचारपूस केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

रोहित पवारांचा राज ठाकरेंना खोचक सल्ला, म्हणाले…

‘मोराचं लग्न झालं रे…’; मित्राच्या लग्नात मोर बनलेला स्वत:च्या लग्नातही थिरकला, व्हिडीओ पुन्हा व्हायरल

उद्धव ठाकरेंनी संघावर टीका केल्याने ‘या’ शिवसेना नेत्याने दिला राजीनामा, म्हणाले…

प्राजक्ता माळीचा ‘रान बाजार’मधील बोल्ड अवतार पाहून नेटकरी संतापले!

संभाजीराजेंना पाठिंबा देण्यासंदर्भात शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणतात…

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More