महाराष्ट्र मुंबई

“नव्या नवरीच्या बांगड्या वाजतात, पण तीच नवरी वर्षभराने घराची मालकीण होते”

पुणे | नव्या नवरीच्या बांगड्या वाजतात हे खरं आहे. पण लक्षात ठेवा, तीच नवरी वर्षभरानंतर त्या घराची मालकीण होते, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.

पुण्यातील हवेली तालुक्यातील वाघोली येथे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड आणि जयंत आसगांवकर यांच्या प्रचारा निमित्त एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सुप्रिया सुळे बोलत होत्या.

महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर विरोधकांनी केलेल्या टीकेचा राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी समाचार घेतला आहे.

कोव्हिड काळात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे हा माझा भाऊ गावागावात माहीत झाला. कोव्हिड काळात पीपीई किट घालून मालेगावला भेट देणारा हा पहिलाच मंत्री आहे, असे गौरवोद्गार सुप्रिया सुळे यांनी काढलेत.

महत्वाच्या बातम्या-

राष्ट्रवादीची ‘ही’ पदाधिकारी अडचणीत; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे पैसे लाटल्याचा आरोप

“आम्ही इंदिरा गांधींचं ऐकलं नाही, तुम्ही कोण आहात?”

“शरद पवारांची वृत्ती पाठीत खंजीर खुपसण्याची”

वीज बिल भरू नका, राज ठाकरेंचं जनतेला पत्राद्वारे आवाहन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या