देश

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सुप्रिया सुळे आक्रमक; ‘या’ मुद्द्यावरून मोदी सरकारला घेरलं!

नवी दिल्ली | संसदेच्या अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या संसदेत कायम सक्रिय असतात.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सुप्रिया सुळेंनी देशाच्या आर्थिक परिस्थितीवरून मोदी सरकारला धारेवर धरलं. सुप्रिया सुळे यांनी शुन्यप्रहरात देशाच्या आर्थिक परिस्थितीवरून आक्रमकपणे मोदी सरकारला प्रश्न विचारले आहेत.

देश सध्या आर्थिक संकटात आहे. तरूणांना रोजगार नाही त्यामुळे तातडीने उपाय योजना करण्याची गरज आहे. मात्र तसं होताना दिसत नाही, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय.

लॉकडाऊनमुळे सगळा देश अडीच तीन महिने बंद होता. त्यामुळे लाखो लोकांचा रोजगार गेला. कोरोनामुळे आपल्यासह जगभरातील बहुतांश देशांना मोठा फटका बसला. यामुळे झालेली हानी भरुन काढण्यासाठी केंद्र सरकारने उपाययोजना हाती घेण्याची नितांत आवश्यकता आहे, असं सुळे यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

“ठाकरे ब्रँड हे काय नवीन काढलंय?, राज्यात एकच ब्रँड ते म्हणजे…”

भाजप प्रवक्त्याने मराठी अभिनेत्रींबद्दल केलेल्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर बांदेकर संतापले; म्हणाले…

“देवेंद्र फडणवीसांनी खडसेंच्या रुपात एक ओबीसी नेता संपवला”

“50 वर्षांत शरद पवारांनी मराठा आरक्षण का दिलं नाही?, आरक्षण देण्याची तुमची इच्छा कधीच नव्हती”

‘बॉलिवूडशी नातं सांगणारे वांद्रे पूर्वेला राहतात’; शेलारांचा आदित्य ठाकरेंना टोला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या