‘गुलाल आपलाच…’; निकालाआधीच सुप्रिया सुळेंच्या विजयाचे बॅनर्स झळकले

Supriya Sule Banner | बारामती लोकसभा मतदारसंघात जोरदार लढत सुरू होती. तिसऱ्या टप्प्यातील बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरूद्ध पवार अशी लढत झाली. गेले अनेक दिवस शरद पवार हे लेक सुप्रिया सुळेंसाठी बारामतीसह इतर मतदारसंघात प्रचारसभा गाजवत होते. निकाल हा 4 जून रोजी लागणार असल्याचं समजतंय.मात्र निकालाआधीच सुप्रिया सुळे विजयी होणार असल्याचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. (Supriya Sule Banner)

सुप्रिया सुळेंच्या विजयाचे बॅनर्स झळकले

बारामती लोकसभा मतदारसंघात भोर, वेल्हा, मुळशी, खडकवासला, पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर मतदारसंघांचा बारामती लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. या सर्वच मतदारसंघात चांगलं मतदान झालंं. मात्र मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या बारामती लोकसभा मतदारसंघातून मतदान हे कमी झालं आहे. त्याला अनेक कारणं होती. सध्या उन्हाळ्यामुळे उष्मघाताच्या प्रमाणात अधिक वाढ होताना दिसत असल्याचा परिणाम हा मतदानावर झाला.

बारामती लोकसभा मतदारसंघात मतदानादिवशीही शरद पवार गटाने अनेक आरोप केले होते. मतदानादिवशीही अनेक राजकीय नाट्य पाहायला मिळाले. अजित पवार आपल्या आईला मतदानादिवशी मतदान करण्यासाठी बुथवर घेऊन आले तेव्हा राजकीय ड्रामा पाहायला मिळाला होता. तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या घरी जात अजित पवार याच्या आईची आशीर्वादासाठी भेट घेतली. मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच सुप्रिया सुळे यांच्या बॅनरबाजीची (Supriya Sule Banner) जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. याकडे अवघ्या देशाचं लक्ष आहे. तसेच बारामती लोकसभा मतदारसंघात काय होईल? याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीचा निकाल होण्याआधीच बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर तालुक्यात पुणे – सातारा महामार्गावर ‘गुलाल आपलाच’ अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत. या बॅनरची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. (Supriya Sule Banner)

“…कोण म्हणतंय येत नाय आल्याशिवाय राहत नाय”

बॅनरवर सुप्रिया सुळे यांचा भला मोठा फोटो दिसत आहे. सुप्रिया सुळे यांचं अभिनंदन करण्यात आल्याचं दिसत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भोर तालुक्याचे प्रमुख ज्ञानेश्वर विठ्ठल शिंदे यांनी सुप्रिया सुळे यांच्या विजयाची बॅनरबाजी केली आहे. “मा. सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघात खासदारपदी निवडून आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन”, असं त्या बॅनरवर लिहिण्यात आलं. “गुलाल निश्चित”… कोण म्हणतंय येत नाय आल्याशिवाय राहत नाय, हा आशय मोठमोठ्या बॅनरवर लिहिण्यात आला आहे. (Supriya Sule Banner)

सुप्रिया सुळे यांचा बारामती लोकसभा मतदारसंघातून विजय निश्चित असल्याचं सांगितलं जात आहे. ज्ञानेश्वर शिंदे यांनी माध्यमांशी बोलत असताना प्रतिक्रिया दिली. यामुळे आम्ही त्यांच्या विजयाचे फलक लावले असल्याचं ज्ञानेश्वर म्हणाले आहेत.

News Title – Supriya Sule Banner At Bhor Pune-Bangalore Highway

महत्त्वाच्या बातम्या

सुंदर आणि टवटवीत त्वचेसाठी व्हिटॅमिन C समृद्ध फळे खा!

‘जे मस्तीत वागतात त्यांची मस्ती…’; उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना उत्तर

“उद्या RSS लाही नकली म्हणतील”; उद्धव ठाकरे कडाडले

फुलांच्या माळाने स्वागत केलं नंतर थेट कानाखाली वाजवली; कॉँग्रेस नेत्याचा व्हिडिओ व्हायरल

‘आता फक्त पाडा म्हणालो, विधानसभेला तर…’; मनोज जरांगेंचा गंभीर इशारा