बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रेमी युगलाला मारहाणीची घटना महाराष्ट्राला काळीमा फासणारी- सुप्रिया सुळे

मुंबई | जालन्यात अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला असून पाच जणांच्या टोळक्याने एका प्रेमी युगलाला मारहाण आणि मुलीचा विनयभंग केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे.

जालना येथे काहीजणांनी एका मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. अशा प्रकारचे ‘मॉरल पोलिसींग’करण्याचा अधिकार कुणालाही नाही. त्या मुलीची प्रायव्हसी आपण जपलीच पाहिजे. ही घटना महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे, असं म्हणत त्यांनी निषेध व्यक्त केला आहे.

माझी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की, या घटनेचा व्हिडिओ आपण कुणालाही फॉरवर्ड करु नये. आपल्याकडे तो आला असेल तर तो डिलिट करावा. मी स्वतः गृहखाते व सायबर क्राईम सेलला हा व्हिडीओ डिलिट करावा अशी विनंती केली आहे, असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, जालन्यातील घटनेवर संपूर्ण महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. नराधमांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

जामियामध्ये गोळीबार करणाऱ्या तरुणाचा हिंदू महासभेकडून होणार सत्कार!

महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वात मोठा पुतळा उभारणार- देवेंद्र फडणवीस

महत्वाच्या बातम्या-

आजही देशात नथूराम गोडसेची विचारधारा जिवंत- नवाब मलिक

रत्नागिरीच्या जिल्हा परिषद शाळांच्या गॅदरिंगमध्ये ‘आयटम साँग’वर बंदी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More