माझ्यासाठी विजय महत्वाचा, मताधिक्याचा विचार मी करत नाही- सुप्रिया सुळे

पुणे |  मला लोकांचे प्रश्न संसदेत मांडायचे असल्याने मी किती मताधिक्याने निवडून येते हे महत्वाचे नाही. विजय महत्वाचा आहे, असं बारामतीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

माझ्या मतदारसंघाचे नाव देशात वरच्या क्रमांकावर पाहिजे. माझा मतदारसंघा मला विकासाच्या बाबतीत कायम अग्रेसर पाहिजे, असं सुळे म्हणाल्या.

माझ्या मतदारसंघात मोदींनी आणि फडणवीसांनी सभा घेऊन मला काहीही फरक पडणार नाही, असं मतही सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलं आहे.

माझे आणि प्रतिस्पर्धी उमेदवार कांचन कुल यांचं कौटुंबिक नातं आहे. त्यांच्याकडे मी अतिशय प्रेमाने पाहते, असंही सुळे म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या

-अखेर उद्धव ठाकरेंनी त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची माफी मागितली

-औरंगाबादच्या ‘या’ बंडखोर आमदाराने दिला अपक्ष उमेदवाराला पाठिंबा

-‘यापुढे असं बोलायचं नाही’; भरसभेत शरद पवारांची अमरसिंह पंडितांना ताकीद

-प्रणिती शिंदेचा थेट प्रकाश आंबेडकरांवर हल्लाबोल!

-भाजप प्रणीत एनडीए सरकारला 350 जागा मिळतील; रामदास आठवलेंचा दावा