महाराष्ट्र मुंबई

“बाळासाहेबांचे संस्कार अजूनही जिवंत आहेत”

मुंबई | मनसे प्रमुख राज ठाकरे यांची कोहिनूर मिल प्रकरणी चौकशी सुरू आहे. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ईडीची चौकशी म्हणजे राजकीय दबाव तंत्र आहे. जो कोणी सरकारविरोधात आवाज उचलतो त्याचा आवाज दडपण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

बाळासाहेबांचे संस्कार अजूनही जिवंत आहेत. यामुळेच उद्धव ठाकरे यांनी भाऊ राज ठाकरेंची बाजू घेतली, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. त्या मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होत्या.

कठिण प्रसंगी कोणाच्याही मागे त्यांच्या कुटुंबातील सदस्य उभे राहतात. त्यामुळे राज ठाकरे यांच्यासोबत कुणी गेलं तर त्यावर टीका करू नये, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटल आहे.

दरम्यान, ईडीच्या चौकशीसाठी कुटुंबासहीत जाणाऱ्या राज ठाकरे यांच्या कुटुंबीयांवर कोणीही टीका करण्याची गरज नाही, असंही सु्प्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या