Top News

सभेत काळा मोजाही न चालणारे सरकार घाबरले आहे- सुप्रिया सुळे

दौंड | शुक्रवारी दौंडमध्ये विरोधी पक्षांची सभा झाली. यावेळी सभेला त्यांना काळा मोजाही चालला नाही. सभेत काळा मोजाही न चालणारे सरकार घाबरले आहे, अशा शब्दात बारामतीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे.

सुप्रिया सुळेंची बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड येथे सभा झाली. यावेळी त्यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला.

त्यांना सभेला काळा मोजा घालून आलेलं चालत नाही. पण आपल्या सभेला काळी साडी घालून सरपंच स्टेजवर बसल्या आहेत. हे सरकार रंगांचे राजकारण करतंय. सरकार प्रचंड घाबरलंय… असं सुळे म्हणाल्या.

दरम्यान, दौंडच्या सभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, सक्षणा सलगर, रमेश थोरात हे प्रमुख नेते उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

-मला ‘मुन्नाभाई’ म्हणून हिणवता मात्र तुम्ही तर ‘भाई’ आहात- सुजय विखे

-प्रकाश आंबेडकरांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणं वृद्धास पडलं महागात

-प्रीतम मुंडे यांच्यापेक्षा जास्त मतांनी डॉ. सुजय विखेंना निवडून द्या- पंकजा मुंडे

-जिथं कायदे बनतात तिथं कायदे मोडणाऱ्यांना पाठवणार का?; पंकजा मुंडेंचा सवाल

-राफेलचं प्रकरण…! आव्हाडांचं हटके अंदाजातील गाणं आणि भाजपला चिमटे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या