नवी मुंबई | मला इंटरनॅशनल डॉन ओळखतात, असं वक्तव्य करणारे भाजपचे नेते गणेश नाईक यांची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या. तसेच या मेळाव्यात बोलताना नवी मुंबईत सत्ता परिवर्तन 1 हजार 1 टक्के होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा दावा सुुप्रिया सुळेंनी केलाय.
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना ओळखणाऱ्या या नेत्यामुळे देशातील आणि नवी मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. येत्या संसदीय अधिवेशनात हा विषय मांडणार असून नाईक यांच्या चौकशीसाठी पाठपुरावा करणार असल्याचं सुुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पारदर्शकपणे महाराष्ट्रातील जनतेला याचं उत्तर द्यावं. कारण नागरिकांची सुरक्षा ही माझी नैतिक जबाबदारी आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात.
जे पक्ष सोडून गेले आहेत त्यांनी तिकडेच रहावं. परत माती कराय़ला येऊ नका, असा टोला देखील सुप्रिया सुळे यांनी यावेळी लगावला आहे.
थोडक्यात बातम्या-
कोरोनाला रोखण्यासाठी पुण्यात नवी नियमावली लागू, जाणून घ्या नेमकी काय आहे
धकधक गर्ल माधुरी दीक्षितचं नवं फोटोशूट; चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा पाऊस
राजकीय नेते कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत, खरं तर ही आमची मोठी चूक- विश्वजीत कदम
जिल्हाधिकारी असावा तर असा, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला ‘हा’ स्तुत्य निर्णय!
“नरेंद्र मोदींनी अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं”