आदिवासी महिलांसोबत खासदार सुप्रिया सुळेंचं आदिवासी नृत्य

वर्धा | राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेदरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चक्क आदिवासी नृत्यावर ठेका धरला. तर राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ फुगडी खेळल्या.

राष्ट्रवादीने शेतकऱ्यांच्या तसेच जनतेच्या प्रश्नावर हल्लाबोल यात्रा काढलीय. यात्रेच्या चौथ्या दिवसाची सुरुवात कोरकु आदिवासींच्या पारंपारिक नृत्याने करण्यात आली.

दरम्यान, या यात्रेत राष्ट्रवादीचे नेते वाटेत भेटणाऱ्या शेतकरी, कष्टकरी तसेच ग्रामीण जनतेचे प्रश्न समजावून घेताना दिसत आहेत.