बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून सुप्रिया सुळेंना ‘हे’ ट्विट करावं लागलं डिलीट!

मुंबई | राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त एक ट्विट केलं होतं. ते ट्विट त्यांनी आता डिलीट केलं आहे.

प्रबोधनकार के. सी. ठाकरे असा या ट्विटमध्ये उल्लेख होता. प्रबोधनकार ठाकरे यांची आज 137 वी जयंती आहे. त्यानिमित्त त्यांनी हे ट्विट केलं होतं. ते ट्विट त्यांनी डिलीट केलं आहे. मात्र यावरून आता नवा वाद निर्माण झालाय. यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठलीये.

सुप्रिया सुळेंच्या या ट्विटची सोशल मीडियावर चर्चा रंगलीये. सुप्रिया सुळे यांच्या या ट्विटवर मनसेने आक्षेप घेतला. त्यानंतर तातडीने हे ट्विट डिलीट करून नव्याने ट्विट करण्यात आलं आहे. सध्या या ट्विटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

प्रबोधनकार ठाकरे यांना के.सी. ठाकरे म्हणण्याएवढ्या सुप्रिया ताई मोठ्या झालेल्या नाहीत, असं ट्विट मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केलंय. राजकीय वर्तुळातूनही यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी त्यांच्यावर यावरून टीका केलीये.

नव्याने पोस्ट करत सुप्रिया सुळे यांनी जयंतीनिमित्त प्रबोधनकार ठाकरेंना अभिवादन केलंय. त्यात म्हटलं की, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील खंबीर नेतृत्व, थोर समाजसुधारक, कणखर पत्रकार प्रबोधनकार ठाकरे यांची आज जयंती. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन असं लिहिलं होतं.

 

थोडक्यात बातम्या- 

Share Market | ‘या’ शेअरनं करुन दिली छप्परफाड कमाई; गुंतवणुकदार बनले करोडपती

जिओकडून सर्वात स्वस्त प्लॅनची घोषणा, अनलिमिटेड कॉलिंगसह नेटही मिळणार!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More