मुंबई | छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी असा ज्याचा लौकीक आहे तो किल्ले राजगड वेल्हा तालुक्यात आहे. मराठी माणसांच्या अस्मितेचे प्रतिक म्हणून राजगड अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे वेल्हा तालुक्याला ‘राडगड’ नाव द्यावं, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा दोन दशकांहून अधिक काळ कारभार हा राजगड किल्ल्यावरून पाहिला. महाराजांनी ज्या स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, जपलं आणि ते प्रत्यक्षात आणलं असल्याचंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.
शासकीय मुद्रणालयाने 1939 साली प्रकाशित केलेल्या पालखुर्द या गावाच्या नकाशात तालुका राजगड असा उल्लेख आहे. याशिवाय इतिहास संशोधन मंडळाकडेही तालुका राजगड उल्लेख आढळतो. हे सर्व मुद्दे लक्षात घेता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर नामकरण करावं, सुळेेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर काय निर्णय घेतात?, याकडे सर्व वेल्हेकरांचं लक्ष लागलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
दिल्लीतील हिंसाचार हा पूर्वनियोजित कट आहे; सोनिया गांधींचा गंभीर आरोप
शिवसेनेला फक्त पवारांचीच भाषा समजते- चंद्रकांत पाटील
महत्वाच्या बातम्या-
“शिवसेनेला अडचणीत आणण्याची भाजपमध्ये ताकद नाही”
‘हिंसाचारावरून राजकारण करणं चुकीचं’; भाजपचं सोनिया गांधींना प्रत्युत्तर
दिल्ली हिंसाचाराबाबत मोदींनी मौन सोडलं; म्हणाले…
Comments are closed.