तारिक अन्वर यांच्या राजीनाम्यामुळे खासदार सुप्रिया सुळेंना मिळालं नवं पद

तारिक अन्वर यांच्या राजीनाम्यामुळे खासदार सुप्रिया सुळेंना मिळालं नवं पद


नवी दिल्ली | राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची लोकसभेतील राष्ट्रवादी पक्षाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. 

राष्ट्रवादीचे खासदार तारिक अन्वर यांनी नुकतीच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यापूर्वी हे पद त्यांच्याकडे होतं. 

अन्वर यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर सुप्रिया सुळेंची नियुक्ती करण्यात आली.

सुप्रिया सुळे लोकसभेतील गटनेत्या झाल्यामुळे आता त्यांच्यावर पक्षाची बाजू सभागृहात मांडण्याची जबाबदारी आली आहे. 

Google+ Linkedin