इंदापुरात नाराजीनाट्य, अजित पवार व्यासपीठावर असताना सुप्रिया सुळेंना प्रेक्षकांमध्ये बसवलं

Supriya Sule

Supriya Sule l पुण्यातील इंदापुरातील (Indapur) एका सरकारी कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना स्थानिक खासदार असूनही व्यासपीठावर स्थान मिळालं नाही, यावरून नाराजीनाट्य उभं राहिलं. अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharne), आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उपस्थित होते, मात्र सुप्रिया सुळे यांना प्रेक्षकांमध्ये बसावं लागलं.

सुळे यांनी या कार्यक्रमात सरकारी शिष्टाचार (Protocol) न पाळल्याबद्दल स्पष्ट नाराजी व्यक्त केली. स्थानिक खासदार असूनही कार्यक्रम पत्रिकेत आपलं नाव नसल्याची तक्रार त्यांनी केली. हा मुद्दा विरोधकांच्या कार्यक्रमांमध्ये वारंवार घडत असल्याचा त्यांनी उल्लेख केला.

खासदार असूनही व्यासपीठावर स्थान नाही :

इंदापूर तालुका बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha Constituency) येतो, आणि सुप्रिया सुळे या त्या मतदारसंघाच्या खासदार आहेत. मात्र, उद्घाटन कार्यक्रमाच्या पत्रिकेत त्यांचं नाव नव्हतं, तसेच व्यासपीठावर त्यांच्यासाठी जागा राखीव नव्हती. परिणामी, त्यांना प्रेक्षकांमध्ये बसावं लागलं, आणि त्यांचा सत्कारही व्यासपीठावर न करता खालीच करण्यात आला.

कार्यक्रम सुरु होण्याआधी त्यांनी राष्ट्रवादीचे मंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्याशी संवाद साधला. मात्र, भाऊ-बहिण असले तरी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी एकमेकांशी संवाद साधणं टाळल्याचं पाहायला मिळालं.

 Supriya Sule l सरकारी कार्यक्रमांतील प्रोटोकॉलबाबत सुळे यांच्या तक्रारी :

हा प्रकार पहिल्यांदाच घडला नाही. याआधीही राज्यभरातील सरकारी कार्यक्रमांमध्ये विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना दुर्लक्षित केल्याच्या तक्रारी सुप्रिया सुळे यांनी वारंवार मांडल्या आहेत. स्थानिक खासदार असूनही कार्यक्रम पत्रिकेत नाव न ठेवणं आणि व्यासपीठावर स्थान न देणं, ही सुळे यांच्यासाठी गंभीर बाब आहे.

सुळे यांनी यापूर्वी बारामतीतील आणि राज्यातील इतर कार्यक्रमांतही शिष्टाचार न पाळल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. इंदापुरातील या घटनेमुळे विरोधकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

News Title : Supriya Sule Expresses Displeasure Over Protocol Breach at Indapur Event

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .