“मुख्यमंत्र्यांवर कितीही हल्ले झाले तरी ठाकरेंचा संयम ढळला नाही”
पुणे | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्यानं विविध कारणामुळं टीका होत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरेंनी भोंग्याचा विषय आक्रमकपणे राज्यात मांडल्यानंतर वाद वाढला आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांनी हनुमान चालीसावरून शिवसेनेला आव्हान दिल्यानंतर आता खासदार सुप्रिया सुळेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे किती सुसंस्कृत आहेत, त्यांनी एकही शब्द काढला नाही. त्यांच्यावर कितीही हल्ले झाले तरी त्यांनी आपले मराठी आणि भारतीय संस्कार शाबूत ठेवले, असं सुळे म्हणाल्या आहेत. ठाकरेंच्या स्वभावाचा मला अभिमान आणि कौतूक आहे, असं सुळे म्हणाल्या आहेत.
लोक त्यांना वाटेल ते बोलतात पण उद्धव ठाकरे संयमी आहेत. तसेच हनुमान चालीसा म्हणल्यानं राज्यातील आणि अमरावतीच्या जनतेचे प्रश्न सुटणार आहेत का, असं देखील सुळे म्हणाल्या आहेत. सुळेंनी राणा दाम्पत्याच्या भाषेचा आणि आंदोलनाचा चांगलाच समाचार देखील घेतला आहे.
दरम्यान, मुंबईमध्ये राणा दाम्पत्याच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. परिणामी राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची टीका विरोधक करत आहेत.
थोडक्यात बातम्या –
राज्याच्या राजकारणात खळबळ! शिवसेना मंत्र्याच्या पीएवर गोळीबार
“शिवसेनेनं बेईमानी केली नसती तर…”; भाजप नेत्याचा गंभीर आरोप
कोरोना पुन्हा वाढतोय! देशातील ‘या’ राज्यात मास्कसक्ती पुन्हा लागू
“देशात एकमेकांना संपवण्याचा कार्यक्रम सुरू”; अशोक चव्हाणांचं टीकास्त्र
“आमच्याशी पंगा घेऊ नका, खूप महागात पडेल”; राऊत विरोधकांवर बरसले
Comments are closed.