बारामतीत कांटे की टक्कर; पहिल्या फेरीत सुप्रिया सुळे आघाडीवर

Lok Sabha Election 2024 | अवघ्या काही तासांत लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) निकाल लागणार आहे. त्याआधी देशात एकूण सात टप्प्यांत मतदानाची प्रक्रिया पार पडली. मतदानाची ही प्रक्रिया 1 जून रोजी संपली. आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. मतमोजणीला सुरूवात झाली असून पहिला कल समोर आला आहे.

बारामतीमधून सुप्रिया सुळे आघाडीवर

बारामतीमधून महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आघाडी घेतली आहे. तर महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. अत्यंत प्रतिष्ठेची ही लढत मानली जात आहे. अशात पहिल्या कलातच सुनेत्रा पवार या पिछाडीवर दिसत आहेत.

संच जालनामधून रावसाहेब दानवे आघाडीवर आहेत. तसंच चंद्रपूरमधून सुधीर मुनंटीवार पिछाडीवर आहेत. यासह बीडमधून पंकजा मुंडे आघाडीवरुन असून, पुण्यातून मुरलीधर मोहोळ आघाडीवर आहेत. हे सुरुवातीचे कल असून जसजशी मतमोजणी पुढे जाईल त्याप्रमाणे त्यात बदल होऊ शकतात.

Lok Sabha Election 2024 | मोदींची जादू पुन्हा चालणार?

दरम्यान, यंदाची लोकसभा निवडणूक सात टप्प्यात पार पाडली. या निवडणुकीत 64.2 कोटी मतदारांनी मतदान केले आहे. या निवडणुकीत एकूण 31.2 कोटी महिलांनी मतदानाचा अधिकार बजावला. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाची पुढची दिशा 2024 ची निवडणूक ठरवणार आहे. या निवडणूकीचे निकाल स्पष्ट करतील कुणाच्या हाती जाणार सत्तेचा ट्रिगर. मोदींची जादू पुन्हा चालणार? की जनता नवा पर्याय निवडणार.  निकालाआधी जनतेचा कल समजल्या जाणाऱ्या एक्झिट पोलमध्ये सत्ताधारी भाजपच्या पारड्यात मतदान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या- 

भाजपने गुलाल उधळला; या उमेदवाराने फडकावला विजयाचा पताका

मोठी बातमी! निकाल लागण्यापूर्वीच पेट्रोल-डिझेलचे दर घसरले?

सलमान खान गोळीबार प्रकरणी मोठी माहिती समोर!

लोकसभेच्या निकालाआधी उद्धव ठाकरेंना पहिला मोठा धक्का!

निकालाआधीच झळकले नवनीत राणांच्या विजयाचे बॅनर