बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुप्रिया सुळे यांनी घेतली सोनिया गांधींची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

नवी दिल्ली | परमबीर सिंग यांच्या लेटर बाॅम्बमुळे गृहमंत्र्यांसहीत ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठत आहे. या सर्व प्रकारात ठाकरे सरकारची मोठी बदनामी झाली आहे. त्यानंतर सरकारमधील मंत्री आणि नेते आता खडबडून जागे झालेले दिसून येत आहेत. या सर्व प्रकारानंतर महाविकास आघाडीच्या गोटात वेगवान हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. त्याच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

आपण सोनिया गांधी यांची भेट घेतली असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत दिली आहे. तुमच्यासाेबत चर्चा करणं हे नेहमीच आनंददायी असतं. तुमच्या बहुमुल्य मार्गदर्शनासाठी खुप खुप आभारी आहे, असं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.

महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून सोनिया गांधी यांनी सरकारच्या कारभारात याआधी हस्तक्षेप केला नव्हता. पण आता राज्यात घडलेली प्रकरणे सरकारच्या अंगलट येत असल्याने सोनिया गांधी यांचं मार्गदर्शन ठाकरे सरकार घेताना दिसत आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री शासकीय निवासस्थानावर बैठकांचा धडाका लावताना दिसत आहेत.

दरम्यान, बुधवारी रात्री मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत अनिल देशमुख, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नाना पटोले, एकनाथ शिंदे, अनिल परब, सुभाश देसाई आदी मंत्री उपस्थित होते. त्यामुळे सरकार यापुढे काय पावले उचलणार त्यावर सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मन सुन्न करणारी घटना; सख्ख्या आईच्या संमतीने 15 वर्षांच्या मुलीवर 30 जणांनी केला बलात्कार

“पेशवाई आणण्यासाठी धुंद झालेले ‘बंटी बबली’ आता राजकारणात धुमाकूळ घालत आहेत”

शहीद जवानाला अवघ्या 1 वर्षाच्या लेकीने दिला मुखाग्नी; संपूर्ण देश हळहळला

‘पीछे हटो पीछे…’; दीप प्रज्वलन करताना फोटोसाठी पुढे आलेल्या बाबूल सुप्रियोंवर अमित शहा भडकले, पाहा व्हिडीओ

“महाराष्ट्र सरकारने 100 कोटींच्या वसुलीचा आधी हिशेब द्यावा”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More