Supriya Sule | राज्यात दोन वर्षांपुर्वी शिवसेना पक्षात फुट पडली होती. एकनाथ शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर राज्यात भाजप आणि शिंदे सेनेचं सरकार स्थापन झालं. त्याच्या काही महिन्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये देखील फुट पडली आणि अजित पावर यांनी बंड करत भाजपसोबत युती केली.अशात नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्ता नाट्यवेळी आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कसे भेटायला जायचो, याचा खुलासा केला आहे. (Supriya Sule)
आपण नाव बदलून, वेशांतर करून अमित शाह यांना भेटायला जायचो, असा खुलासा अजित पवार यांनी केला. भेटीदरम्यान नावाचा शॉर्ट फॉर्म, लघु रुप वापरत असल्याचे आणि वेषांतर केल्याची माहिती देखील त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली. यावर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. त्यानंतर आता शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील अजित दादांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.
“.. तर उद्या एखादा दहशतवादी भेटायला येईल”
“अजितदादा तुम्ही नाव बदलून का जात होते?, उद्या एखादा दहशतवादी नाव बदलून येईल. दिल्ली आणि मुंबई विमानतळ, एअरलाईन यांची चौकशी झाली पाहिजे. नागरी विमान वाहतूक मंत्र्यांनी याचे उत्तर द्यायला हवे.”, अशी मागणी यावेळी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
तसेच, असा हलगर्जीपणा असेल तर उद्या एखादा दहशतवादी भेटायला येईल, असा टोला देखील सुळे यांनी लगावला. तसेच तुम्ही अमित शाह यांना का भेटत होतात?,तुम्ही महाराष्ट्र सोबत बेइमानी करत होता. अमित शाह यांच्यासोबत काय बोलत होते? ते चोरुन भेटायला का येत होते?, असे अनेक सवाल सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उपस्थित केले आहेत.
दिल्लीला चोरून येण्यासारखं काय आहे?
इतकंच नाही तर, 2 जुलै रोजी शपथ घेतली. त्याच्या 5 दिवस आधी मोदींनी भ्रष्टाचाराचे आरोप अजित पवार यांच्यावर केले होते. मग आधीच्या 10 भेटी कधी झाल्या?, याचं उत्तर देवेंद्र फडणवीस देणार आहेत काय?, दिल्लीला चोरून येण्यासारखं काय आहे, मी विमान वाहतूक मंत्र्यांना याबाबत विचारणा करणार असल्याचं देखील सुळे म्हणाल्या आहेत.
पुढे त्यांनी भाजपावर देखील जोरदार टीका केली. महाराष्ट्रात भाजपचे सरकार आल्यापासून भ्रष्टाचार वाढला आहे. कोयता गँग, महिला अत्याचार अशा घटना वाढल्या आहेत.आज अजित पवार यांनी राजकीय स्वार्थासाठी नाव बदललं, हे आपल्या राज्याच्या राजकारणाचे संस्कार नाहीत, असा संताप सुळे (Supriya Sule) यांनी व्यक्त केला आहे.
News Title – Supriya Sule on ajit pawar and amit shah
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! अभिनेता शाहरुख खानची तब्येत बिघडली, प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर
रामदेव बाबांना हायकोर्टाचा दणका! ‘त्या’ प्रकरणी पतंजली आयुर्वेदला मोठा दंड
“एकनाथ शिंदे मौलानाचा वेश धारण करून…”; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
अश्लीलतेचा कळस! दिल्ली मेट्रोत तरुणीने केली चक्क प्रग्नेन्सी टेस्ट, Video व्हायरल
“पुणे बरबाद व्हायला..”; राज ठाकरेंचा राज्य सरकारवर संताप