भुजबळ साहेबांवर झालेला अन्याय कधीच विसरणार नाही!

नाशिक | भुजबळ साहेबांवर झालेला अन्याय कधीच विसरणार नाही, आम्ही नेहमीच त्यांच्या पाठीशी उभं राहू, असं राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. हल्लाबोल यात्रेनिमित्त येवल्यात आयोजित सभेत त्या बोलत होत्या.

नाशिक-येवला हा आमच्यासाठी महत्त्वाचा भाग आहे. पक्षस्थापनेच्या वेळी सोबत असलेल्या सुरुवातीच्या नेत्यांपैकी भुजबळ साहेब आहेत. ते पक्षाचे पहिले अध्यक्षही होते, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. 

तसेच ज्यादिवशी भुजबळ साहेब बाहेर येतील त्या दिवशी हे सरकार जाईल हे लक्षात घ्या. 2019 ला निवडणुकीच्या प्रचाराला आम्ही येऊ, तेव्हा तो प्रचार भुजबळ साहेबांचाच असेल आणि भुजबळ साहेबच तो प्रचार करतील, असंही त्या म्हणाल्या.