लाडकी बहीण योजनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “निवडणुकीआधीचा जुमला..”

Supriya Sule | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची राज्यात चर्चा होताना दिसत आहे. राज्यातील महिला या योजनेसाठी विविध कागदपत्रांसाठी तहसिल कार्यालयाबाहेर रांगा लावत आहेत. अशातच आता ज्यांनी अर्थसंकल्प सादर केला त्यांची बहीण अर्थातच खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) अजित दादांनी घोषणा केलेल्या लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलं आहे. महायुती सरकारचा हा निवडणुकीआधीचा जुमला असल्याचं सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या आहेत.

“योजनेतून भ्रष्टाचार होता कामा नये”

ही लाडकी बहीण योजना चांगली असल्याचं सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या आहेत. मात्र त्या योजनेसाठी अनेक अटी घालण्यात आल्या आहेत. त्यासाठी आता अभ्यास सुरू असल्याचं सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या आहेत. या योजनेचं स्वागत केलं पाहिजे. मात्र या याजनेतून कोणताही भ्रष्टाचार होता कामा नये, असं सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या आहेत.

लाडकी बहीण योजना ही मध्यप्रदेशच्या धरतीवर सुरू झाली. त्याठिकाणी भाजपला चांगला फायदा झाला. त्याचपार्श्वभूमीवर आता सुप्रिया सुळे यांनी शिवराज सिंह चौहान यांचं कौतुक केलं आहे. शिवराज सिंह चौहान हे सुसंस्कृत नेते आहेत. त्यांनी मध्यप्रदेशमध्ये चांगलं काम केलं आहे. त्यांच्याकडे डेटा असल्याने त्यांनी लाडकी बहीण योजना राबवली असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

सुप्रिया सुळे यांनी कांदा प्रश्नावर भाष्य केलं आहे. त्यांनी पिय़ुष गोयल यांची भेट घेतली आणि कांदा निर्यातीवरील बंदीवर भाष्य केलं आहे. यामुळे आधी भाजप आणि आताचे एनडीए सरकारला नाकारण्यात आलं आहे. 118 कोटींचा कृषी घोटाळा झाला असल्याचं मी नाहीतर  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय सुरक्षा संघाने आरोप केला आहे. सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही. मात्र उद्योगधंदे करणाऱ्यांची कर्जमाफी केली आहे.

तसेच सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर देखील भाष्य केलं आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित पवार यांच्यावर जे काही भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. त्याचे उत्तर हे देवेंद्र फडणवीस यांनी द्यावं. हे शेतकरी विरोधी सरकार आहे. हे पहिल्यापासून आपल्याला दिसून आलं आहे. तसेच सुप्रिया सुळे यांनी संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.

संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

सुप्रिया सुळे यांनी संभाजी भिडे यांनी महिलांच्या ड्रेसवरून वक्तव्य केलं होतं त्यावरून प्रतिक्रिया दिली होती. संभाजी भिडे म्हणाले की, ज्या महिला ड्रेस घालतात. साड्या न घालणाऱ्या महिलांनी वटसावित्रीची पूजा करू नये, या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांनी पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचा अपमान केला जात आहे. संभाजी भिडे आणि त्यांच्या लोकांकडून हे केलं जात असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

News Title – Supriya Sule On Ladki Bahin Yojana News Update

महत्त्वाच्या बातम्या

ललित पाटील ड्रग्स प्रकरणी मोठी अपडेट समोर!

पावसाळ्यात चिकन-मटण खाताय?, मग ही बातमी वाचाच!

वाहनचालकांना दिलासा! ‘या’ शहरांत पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

अजित पवारांना धक्का! तब्बल ‘इतके’ नेते शरद पवारांच्या संपर्कात?

गुड न्यूज! आज स्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी; जाणून घ्या 10 ग्रॅमचे दर