‘सरकार पक्ष फोडण्यात व्यस्त आहे’, सुप्रिया सुळेंनी वाचून दाखवला समस्यांचा पाढा

Supriya Sule | खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) पुण्यातील समस्यांचा पाढा वाचून दाखवला आहे. त्यानंतर त्यांनी पक्ष फूटीवरून देखील सरकारला डिवचलं आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सरकार हे पक्ष फोडण्यात व्यस्त आहे, असा गंभीर आरोप केला. त्यांनी बारामती लोकसभा निवडणुकीत मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. त्यावर आता त्यांनी राज्य सरकारवर आसूड ओढलं आहे. पुण्यातील नागरी समस्या सोडवण्यासाठी वेळ मिळत नसल्याने आता या समस्यांचं निराकरण मंत्री करतील, असा टोला सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लगावला आहे.

सुप्रिया सुळेंनी पुण्यातील नागरी समस्यांचा पाढा वाचला

पुणे शहरातील नागरी समस्यांचा पाढा वाचून दाखवला आहे. कालच कॅबिनेटमंत्री मुरलीधर मोहोळ आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यात शाब्दिक फटकेबाजी करण्यात आली. त्यानंतर आज सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पुण्यातील नागरी समस्यांचा पाढा वाचून दाखवला आहे.

पुणे शहरात मल्टिपल गोष्टी सुरू आहेत. गुन्हेगारी वाढत आहे, कष्टाने लोकं घरं घेत आहेत, सर्व कोलमडलंय, स्मार्ट सिटी म्हणून पुणे शहराला योजनेत घेतलं गेलं आहे. या सगळ्या अतिक्रमणावर कारवाई करा. फार अपेक्षा होत्या मात्र त्या फोल ठरल्या असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

पुणेकर टॅक्स भरतो, नागरिक मला विचारतात की याला कोण जबाबदार? याला केवळ पुणे पालिका प्रशासन जबाबदार असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. स्मार्ट सिटी म्हणून गाजावाजा केला म्हणून काय झालं?, असा रोखठोक सवाल त्यांनी राज्यासह केंद्र सरकारला केला आहे.

मणिपूरवर भाष्य

त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी संघावर हल्लाबोल केला आहे. मणिपूर हा देश महत्त्वाचा भाग आहे. तिथे राहणारे सर्वजण भारतीय आहेत. पंतप्रधान शपथ घेतात आणि लगेचच दहशतवादी हल्ला होतो. अशावेळी मणिपूरबाबत एक शब्दही काढला नाही. खरं तर तो संघाचा अंतर्गत विषय असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

News Title – Supriya Sule On Muralidhar Mohol About Civic Issue

महत्त्वाच्या बातम्या

अजित ‘दादा’ धोक्यात!, शरद पवारांकडे पोहोचलेल्या कार्यकर्त्यांची मोठी मागणी

अब्दूला लग्नापेक्षाही ती गोष्ट फार महत्वाची; अब्दू रोजिकने लग्न पुढे ढकलण्यामागे हे आहे कारण

पैसे तयार ठेवा, या भन्नाट फीचर्ससह इलेक्ट्रिक कार लाँच होणार

महायुतीत असलो तरी शरद पवारांची विचारधारा सोडणार नाही; अजितदादा भावूक

राज्यातील विद्यार्थ्यांचा गणवेश ठरला! असा असणार शालेय गणवेश; वाचा संपूर्ण नियमावली