बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेनेला भाजपनं मी लाभार्थीच्या जाहिरातीतही स्थान दिलं नाही!

रत्नागिरी | सरकारमध्ये शिवसेना एवढी दुर्लक्षित आहे की भाजपनं मी लाभार्थीच्या जाहिरीतीतही त्यांना स्थान दिलं नाही, अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलीय. रत्नागिरीतील सावर्डे येथे त्या बोलत होत्या.

हिंमत असेल तर शिवसेनेनं सत्ता सोडावी आणि सामान्य माणसाप्रमाणे रस्त्यावर उतरावं, असं त्या म्हणाल्या.

शिवसेना कनफ्युज्ड पार्टी असून त्यांनी दोन्ही दगडांवर पाय ठेवलेत. एकीकडे सत्तेत राहून लाभ घ्यायचा आणि दुसरीकडे विरोधकांची भूमिका घ्यायची, अशी भूमिका त्यांनी बदलावी, असंही त्यांनी सांगितलं.

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More