Supriya Sule | मालवणमध्ये असलेल्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. यावरून राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. महाविकास आघाडीकडून हा मुद्दा आता उचलून घेतला जात आहे. या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी आज(28 ऑगस्ट) महाविकास आघाडीचे नेते राजकोट किल्ल्यावर गेले होते. यामध्ये जयंत पाटील, अंबादास दानवे, आदित्य ठाकरे आणि स्थानिक आमदार वैभव नाईक यांचा समावेश होता.
याचवेळी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे देखील तेथे उपस्थि होते. अदित्य ठाकरे आणि मविआचे नेते परिसरात पोहचले तेव्हा राणे समर्थकांकडून आदित्य ठाकरे यांच्याविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. याला प्रत्युत्तर म्हणून ठाकरेंच्या समर्थकांनीही घोषणाबाजी केली. यामुळे येथे मोठा राडा झाला.(Supriya Sule )
राजकोट किल्ल्यावर राडा, ठाकरे-राणे आमने सामने
आदित्य ठाकरे हे राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी पोलिसांनी नारायण राणेंना मुख्य प्रवेशद्वाराबाहेर थांबवून ठेवले.यावरून नारायण राणे चांगलेच संतापल्याचे दिसून आले.(Supriya Sule )
नारायण राणे हे त्यांचा मुलगा निलेश राणेंसह राजकोट किल्ल्यावर दाखल झाले. यावेळी त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. आम्ही आमचा वेळ पोलिसांना दिला होता. त्यानंतरही हे कसं काय घडलं? हे बाहेरुन येऊन अंगावर येणार का? पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांना हात लावायचा नाही, असे निलेश राणे म्हणाले. तर, नारायण राणे यांनी त्यांना आमच्या अंगावर यायला परवानगी द्या, मी एकेएकाला बघतो, कुणालाही सोडणार नाही, अशी धमकीच देऊन टाकली.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
या सर्व राड्यावर आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “पोलिसांची यत्रंणा आहे ना तिथे, आमचे सर्व नेते जाणार हे आधीच सर्वांना माहिती होतं. मग सरकारचं इंटेलिजन्स काय करत आहे, गृहमंत्र्यांनी शांततेचं अपील केलं पाहिजे. माझी देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे, त्यांनी सर्वांना अपील केलं पाहिजे, शांतता राखून त्यातून मार्ग काढला पाहिजे. आमच्या सर्व नेत्यांना सुरक्षितता आणि जबाबदारी देणे याची जबाबदारी ही महाराष्ट्र सरकारची आहे. आमच्या कोणत्याही नेत्यांच्या केसाला धक्का बसला तर बघा काय होतं.”, असा इशाराच सुळे (Supriya Sule ) यांनी दिलाय.
News Title – Supriya Sule on sindhudurga fort clash
महत्त्वाच्या बातम्या-
‘तारक मेहता..’ मधील भिडे मास्टरने केली निर्मात्यांची पोलखोल?, मालिकाही सोडणार?
अजित पवारांना मोठा झटका, बारामती शेजारचा बडा नेता शरद पवारांच्या गळाला?
युवा पिढीला रोजगार मिळणार! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात औद्योगिक शहर वसणार
PPF आणि सुकन्या समृद्धी अकाउंट असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी!
महिलांना अशाप्रकारे घरबसल्या करता येणार पोलीस स्टेशनमध्ये ऑनलाईन तक्रार