…हा तर ‘भ्रम’संकल्प; खासदार सुप्रिया सुळेंचे टीकास्त्र

मुंबई | मोठ्ठे मोठ्ठे आकडे दाखवायचे आणि पैसे वाटायची वेळ आली की कागदपत्रांमध्ये अडकवायचं, हा तर भ्रमसंकल्प आहे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारच्या शेवटच्या पूर्ण अर्थसंकल्पावर टीकास्त्र सोडलं आहे. 

बड्यांच्या कर्जवसुलीसाठी काहीही नाही… पेट्रोलच्या किमती कमी होण्यासाठी काहीही नाही… शेतीला कर्ज मिळण्याची सोय काहीही नाही… बँकांचे चार्जेस कमी करायला काहीही नाही…, असं सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. 

दरम्यान, एका बाजूला 40000 द्यायचे आणि दुसरीकडून वैद्यकीय खर्च आणि वाहतूक भत्ता काढून घ्यायचा, म्हणजे मध्यमवर्गीयांना फायदा शून्य, असंही त्यांनी म्हटलंय.