युगेंद्र पवार बारामतीचे नवे ‘दादा’?, अखेर सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर

Supriya Sule | बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे (Supriya Sule) या पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनी आपली नणंद आणि अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार (Supriya Sule) यांचा पराभव केला आहे. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीचे राज्यात वारे वाहू लागले आहेत. येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणूक लागू शकतात. याचपार्श्वभूमीवर बारामतीत नवा दादा हवा असल्याची चर्चा आहे. याबाबत सुप्रिया सुळेंना (Supriya Sule) विचारलं असता सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) त्यावर भाष्य केलं आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंचा प्रचार करण्यासाठी युगेंद्र पवार धावत होते. तसेच आता शरद पवार देखील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. यामुळे आता अजितदादांविरोधात युगेंद्र पवारांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. मध्यंतरी शरद पवारांच्या समर्थकांनी देखील बारामतीचा दादा बदलायचा असल्याचं वक्तव्य केलं होतं. तेव्हा शरद पवारांनी यावर आताच बोलणं उचित राहणार नसल्याचं वक्तव्य केलं आहे.

युगेंद्र पवार बारामतीचे नवे दादा?

हा प्रश्न आता सुप्रिया सुळेंना करण्यात आला होता. तेव्हा त्यावर सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलं आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, युगेंद्र पवार चार वर्षांपासून बारामतीत फिरतोय. विद्या प्रतिष्ठानमध्ये त्याचं चांगलं काम आहे. स्थानिक लोकांचे प्रश्न सोडवत आहे. त्यांचं काम करत आहे. तो फिरतोय म्हणून त्याला उमेदवारी दिली जाईल किंवा नाही, याची चर्चा फार लवकर होत आहे असं मला वाटतं. बघूया आता पुढे काय होईल ते असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

सध्या शरद पवार हे दुष्काळी दौरे करत आहेत. बारामतीतील शेतकरी मेळाव्यांना आपली उपस्थिती दाखवत आहेत. त्यावर ते चांगल्या मार्कांनी पास होण्याचा ते प्रयत्न करत असतात. महाविकास आघाडी म्हणून आम्ही चांगल्या मुद्द्यांवर काम करत आहे. मात्र यांचं सरकार आल्यापासून राज्यात असे कोणते चांगले निर्णय घेतले आहेत?, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी प्रतिसवाल केला आहे.

जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यात वाद?

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार यांच्यात मध्यंतरी कलगीतुरा रंगला होता. यावर सुप्रिया सुळेंना विचारण्यात आलं होतं. त्यावर सुप्रिया सुळेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, हे सर्व मीडिया क्रिएटेड आहे. समज गैरसमजातून होणाऱ्या या बातम्या आहेत. याच्यावर कोणत्याही जबाबदार व्यक्तीने भाष्य करू नये, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

शब्दाला शब्द वापराला जातो आणि  उत्सुकतेनं माहिती बाहेर येते. आता एकच लक्ष आहे विधानसभा… गांभीर्याने निवडणूक घेतली पाहिजे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

News Title – Supriya Sule On Yugendra Pawar Vidhansabha Election Latest News

महत्त्वाच्या बातम्या

पाणीपुरी खाणं पडलं महागात, जळगावातील 80 जाणांना विषबाधा

श्रद्धा कपूर होणार मोदी घराण्याची सून; जाहीरपणे दिली प्रेमाची कबुली?

शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये न आल्यास ‘या’ हेल्पलाईन नंबरवर करा तक्रार!

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा रान पेटवणार; लक्ष्मण हाके निर्णय घेणार?

सोनाक्षी-झहीरचे प्री-वेडिंग फंक्शन्स सुरू! ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात