‘सेल्फी विथ खड्डा’नंतर सुप्रिया सुळेंचं रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण!

पुणे | राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे सरकारविरुद्ध चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. कारण ‘खड्डा विथ सेल्फी’ उपक्रमानंतर त्यांनी आता रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेतलाय. 

सुप्रिया सुळे बेलसर ते ऊरळी कांचन रस्त्याने प्रवास करत होत्या. या रस्त्यांवर खड्डे जास्त असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण केलं. 

नुकतीच त्यांनी  नावाची मोहिम सुरु केलीय. ज्याद्वारे खड्ड्यांसोबत सेल्फी काढून तो सोशल मीडियावर टाकण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलंय.