सुप्रिया सुळेंचे मॅरेथॉन प्रचार दौरे, शहरातून वाढतोय पाठिंबा

पुणे | मतदानाची तारिख जवळ येत आहे, तशी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची धावपळ होत आहे. खासदार सुप्रिया सुळे सध्या मॅरेथॉन प्रचारदौरे करत आहेत.

पुण्याच्या काही भागांमध्ये आज संध्याकाळी सुप्रिया सुळे यांनी प्रचारदौरा काढला. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तसेच मतदार मोठ्या संख्येने त्यांच्या प्रचारदौऱ्यात सहभागी झाल्याचं चित्र पहायला मिळालं.

कात्रज, धायरी विद्यापीठ, येवलेवाडी आणि भेकराईनगरमध्ये जाऊन सुप्रिया सुळेंनी मतदारांशी संवाद साधला. यावेळी ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात सुप्रिया सुळेंचं स्वागत करण्यात आलं.

दरम्यान, इतर उमेदवारांच्या तुलनेत शहरात सुप्रिया सुळेंनी जोरदार प्रचार चालवला आहे. सुप्रिया सुळेंच्या झंझावातामुळे त्यांना शहर तसेच खडकवासलातून मोठं मताधिक्य मिळण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

-‘पुलवामा तुम्ही घडवला की काय?’ राज ठाकरेंना संशय

-मी विनंती करतो बेसावध राहू नका, मोदी-शहा तुमचं जगणं हराम करतील- राज ठाकरे

-शिवाजी राजांची प्रेरणा घेऊन मोदी शहांविरूद्ध लढायला उभा राहिलोय- राज ठाकरे

-थोड्याच वेळात राज ठाकरे म्हणणार… ऐ लाव रे तो व्हीडिओ!

-पुण्यात काँग्रेस बॅकफूटवर?; अद्याप एकाही बड्या नेत्याची सभा नाही