बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘त्या’ व्हायरल डान्स व्हिडीओवर होणाऱ्या टीकेला सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर, म्हणाल्या…

मुंबई | खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार संजय राऊत यांचा डान्स करतानाचा व्हिडीओ मागच्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षाकडून टीकेची झो़ड उठली आहे. भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी एकीकडे शेतकरी, एसटी कर्मचारी आत्महत्या करत असताना तुम्ही काय करता तर नाचता, अशी टीका केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर टीका करणाऱ्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. ‘तो एक कौटुंबिक कार्यक्रम होता आणि आमच्या घरातील मुलीचं लग्न होतं. आता आमच्या खासगी आयुष्यातील कार्यक्रमावर लोकांना टीका करायची असेल तर आम्ही काय बोलणार?, अशी प्रतिक्रिया देत टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी चांगलंच सुनावलं आहे.

‘प्रायव्हेट फंक्शनमध्ये आम्ही काय करतो यावरून टीका होत असेल तर काय बोलणार’, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. सध्या गेल्या दोन दिवसांपासून संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. संजय राऊत यांची कन्या पुर्वशी हिचा विवाह ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याशी काल पार पडला.

लग्नाच्या पुर्वसंध्येला संगित कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमादरम्यान संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी एका गाण्यावर चांगलाच ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. त्यावरून टीका झाल्यानंतर हिवाळी अधिवेशनाला जाण्यापुर्वी सुप्रिया सुळेंनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

थोडक्यात बातम्या

चहाप्रेमींनो सावधान! चहाच्या अतिसेवनाने होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम

तीन बायका फजिती ऐका! बायकांच्या हट्टापाई नवऱ्याने केलं असं काही की…

नव्या व्हेरिएंटमुळे जगाची चिंता वाढली, प्रवासासह इतरही गोष्टींवर आली बंधनं

पराग अग्रवाल ट्विटरचे नवे सीईओ होताच कंगनाची प्रतिक्रिया, म्हणाली…

महाराष्ट्रातील कोरोना आटोक्यात, जाणून घ्या आकडेवारी एका क्लिकवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More