आरक्षणासंबंधी छगन भुजबळांच्या आरोपांवर सुप्रिया सुळेंचं जशास तसं प्रत्युत्तर; म्हणाल्या..

Supriya Sule | आरक्षणाच्या आडून महाराष्ट्र पेटवण्याचं काम काही लोक करत आहेत, असा गंभीर आरोप अजित पवार गटाचे नेते  छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे. त्यांच्या या आरोपांनी राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.

अजित पवार, रुपाली चाकणकर, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा बारामतीत मेळावा आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात भुजबळ यांनी हे विधान केलंय. त्यांच्या या आरोपांना आता शरद पवार यांच्या कन्या तथा खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलंय.

सुप्रिया सुळे यांचं प्रत्युत्तर

“आरक्षणाच्या बैठकीवर शरद पवारांमुळे विरोधकांनी बहिष्कार टाकल्याचा काही पुरावा आहे का त्यांच्याकडे साडीआर काढून बघू कोणी कोणाला फोन केला ते. ते काढणं काही फार अवघड नाही, मी गेली 10 वर्षे आरक्षणावर बोलते आहे. ते तर आता बोलत आहेत.”, असं सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या आहेत.

“मी संसदेत धनगर, मराठा, लिंगायत, मुस्लीम आणि भटक्या-विमुक्त जातींच्या आरक्षणावर सातत्याने प्रस्ताव आणा, आम्हाला प्रस्ताव पाठवा, आम्ही ताकदीने तुमच्यासोबत उभं राहु असं म्हटलंय.”, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

तसंच पुढे त्या म्हणाल्या की, “कोणत्याही सर्वपक्षीय बैठकीचा प्रस्ताव आम्हाला पाठवण्यात आलेला नव्हता. प्रस्ताव आल्याशिवाय अजेंडा कसा समजणार?, या सरकारला खरंच आरक्षण द्यायचं असेल तर, तर मुख्यमंत्र्यांनी कोणालाही एक फोन करावा आणि बैठक करावी. त्यांनी बोलवावं आणि त्यांनी अजेंडा सांगावा आम्ही उपस्थित राहू.”

छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले होते?

राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच मराठा आरक्षणावर मार्ग काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला महाविकास आघाडीच्या तीनही घटक पक्षांकडून बहिष्कार टाकण्यात आला होता.

या बैठकीबाबतच भुजबळ यांनी मोठा खुलासा केलाय. “तुमचं वैर या छगन भुजबळशी असेल किंवा अजित पवारांशी असेल ओबीसी समाजाने तुमचं काय घोडं मारलंय?हे सगळं मिटवण्यासाठी तुम्ही आमच्याबरोबर का येत नाही? विरोधी पक्षाचे नेते बैठकीला येणार होते त्यांना बारामतीतून फोन गेला म्हणून ते आले नाहीत.”,असा खुलासा छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलाय. त्यांच्या या आरोपांनाच सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उत्तर दिलंय.

News Title-  Supriya Sule reply on Chhagan Bhujbal allegations

महत्वाच्या बातम्या-

“तुम्ही फक्त अर्ज करा, तो मंजूर करणं..”; लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य

छगन भुजबळांचा शरद पवारांवर अत्यंत गंभीर आरोप; महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ

अनंत-राधिकाच्या लग्नात हार्दिक पांड्या 2 टकिला मागतानाचा VIDEO व्हायरल!

धक्कादायक! अमरावतीत सिटी बसने चौघांना चिरडले, 9 वर्षीय चिमूकल्याचा चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू

TATA-BSNL यांच्यात मोठा करार; जिओ, एअरटेलचं टेन्शन वाढणार?