वेल्हाचं नाव ‘राजगड’ करा; सुप्रिया सुळेंची आग्रही मागणी

पुणे | पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्याचं नाव बदलून त्याचे ‘राजगड’ असे नामकरण करुण्यात यावे, अशी विनंती सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मराठी माणसाच्या अस्मितेचं प्रतिक म्हणून किल्ले ‘राजगड’ अतिशय महत्वपूर्ण आहे. त्यामुळे या किल्ल्याचे नाव तालुक्याला देण्यात यावे, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे.

छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी असा ज्याचा लौकीक आहे तो किल्ले राजगड वेल्हा तालुक्यात आहे. येथूनच शिवरायांनी दोन दशकांहून अधिक काळ कारभार पाहिला. स्वराज्याचे स्वप्न पाहिले,जपले व ते प्रत्यक्षात आणले, असं ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

दरम्यान, जुन्या दस्ताऐवजात शिवकालापासून ते 1947 पर्यंत वेल्ह्याचा उल्लेख ‘राजगड तालुका’ असाच केलेला आढळतो. शासकीय मुद्रणालयाने 1939 साली प्रकाशित केलेल्या पालखुर्दच्या नकाशातही राजगड तालुका असा उल्लेख आहे.

महत्वाच्या बातम्या-

-छगन भुजबळांच्या शिवसेना प्रवेशावर उद्धव ठाकरे म्हणतात…

काँग्रेस-राष्ट्रवादीला पुढील 15 वर्षे सत्ता मिळणार नाही- चंद्रकांत पाटील

-…म्हणून शरद पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस दिसणार ‘या’ दिवशी एकाच मंचावर!

-भाजपात जाणाऱ्या पिचडांविरोधात मतदारसंघातली जनता ‘या’ कारणामुळे आक्रमक!

-पवारांची साथ सोडताना अन् भाजप प्रवेश करताना शिवेंद्रराजेेे म्हणतात…