खासदार सुप्रिया सुळे यांना ‘श्रेष्ठ सांसद’ पुरस्कार जाहीर

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना ‘श्रेष्ठ सांसद’ पुरस्कार जाहीर झाला आहे. फेम इंडिया-एशिया पोस्टच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो. 

सुप्रिया सुळे यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. त्यांनी याविषयी माहिती देणारं ट्विट केलं आहे.

फेम इंडिया-एशिया पोस्टच्या वतीने देण्यात येणारा श्रेष्ठ सांसद पुरस्कार ( कॅटॅगरी – उर्जावान ) मला जाहीर झाला आहे. श्रेष्ठ सांसद पुरस्कार मिळण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.

दरम्यान, जनतेचे अलोट प्रेम हीच या पुरस्कारामागची खरी उर्जा आहे. ही उर्जाच मला सदैव कार्यरत राहण्याची प्रेरणा देते, असंही त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-चक्क पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बांधलेलं घरच गेलं चोरीला!

-शरद पवार आणि नारायण राणेंच्या भेटीवर चंद्रकांत पाटील म्हणतात…

-तुमच्यासाठी कायपण!!! उद्धव ठाकरेंसाठी मुख्यमंत्र्यांनी मोडला प्रोटोकॉल

-राजस्थान जिंकण्यासाठी घाम गाळत आहेत आदित्य ठाकरे!

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंनी वाजवला ‘युतीचा नगारा’?