बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तर आपलं सीट शंभर टक्के निवडून आलं समजा- सुप्रिया सुळे

पुणे | राज्यात मागील काही दिवसांपासून चौकशा, दावे, अब्रुनुकसानी, भ्रष्टाचार आणि ईडी या शब्दांभोवती राजकारण फिरताना दिसत आहे. राज्यातील महाविकास आघाडीतील काही मंत्र्यांची ईडीनं झोप उडवली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काही मंत्र्यांची सध्या ईडीकडून चौकशी सुरू आहे.  यामध्ये अनिल देशमुख, अनिल परब, भावना गवळी यांना ईडीने चौकशीसाठी समन्स पाठवलं आहे.

राज्यातील आगामी निवडणुकांमध्ये जर कोणी इच्छुक असेल तर दोन गोष्टी लक्षात ठेवा. जर तुम्हाला ईडीची नोटीस आली असेल आणि पाऊस पडला असेल तर आपली सीट शंभर टक्के निवडून आली समजा, असा मोलाचा सल्ला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

निवडणुकांमध्ये आपला ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे. तसेच कोणास तिकीट मिळणार आहे, मला माहित नाही. जे इच्छुक पावसात भिजले आहेत त्यांनी समजावं की, पप्पू पास हो गया है, असं सुळेंनी म्हटलं आहे. पुण्यातील बावधनच्या भागात रूग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात सुळेंनी जोरदार टोलेबाजी करत कार्यकर्त्यांना निवडणुक जिंकण्याचा कानमंत्रच दिला आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे बुलडाणा येथे राष्ट्रवादीच्या परिसंवाद यात्रेनिमित्त होत्या. त्यांनी जे लोक भाजपला विरोध करतात, त्यांनाच ईडीची नोटीस मिळत आहे. सध्या ईडीची नोटीस मिळण्याची फॅशनच झाली आहे, असंही सुळे म्हणाल्या होत्या.

 

थोडक्यात बातम्या –

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

पंजाबच्या राजकारणात मोठा भुकंप! सिद्धूंच्या राजीनाम्यानंतर ‘या’ 4 बड्या नेत्यांचा राजीनामा

माझ्या मुलीची अन् बाळासाहेबांची शप्पथ घेऊन सांगतो…- अनिल परब

“उद्धव ठाकरेंनी यांना सरकारमध्ये घेतलं तेव्हा मेलेले जिवंत झाले”

MPSC चा निकाल जाहीर! प्रसाद चौगुले राज्यात प्रथम, तर मुलींमध्ये मानसी पाटील

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More