… तर नराधमांना एकदा तरी पब्लिकली फाशी द्यावी, सुप्रिया सुळे संतापल्या

Supriya sule l महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे देशभरात संतापाचे वातावरण पसरले आहे. अशातच आज बदलापूरमध्ये चार आणि सहा वर्षांच्या दोन लहान मुलींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी सफाई कर्मचाऱ्याने शाळेच्या स्वच्छतागृहात दोन चिमुकल्यांवर अत्याचार केला आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

सुप्रिया सुळेंनी दिली संतप्त प्रतिक्रिया :

बदलापूर येथील अत्याचार घटना प्रकरणावर राजकीय वर्तुळातून संतापाची लाट उसळली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेवर रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देताना म्हणल्या की, नराधम आरोपींना एकदा तरी पब्लिकली फाशी द्यावी, कारण की असे केल्याशिवाय अशा नराधमांना धडकी भरणार नाही अशी संतप्त खासदार प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

यासंर्भात राज्य सरकारने याबाबत अत्यंत कठोर कारवाई केली पाहिजे. कारण राज्यात महिलांबाबत होणारे अन्याय अत्याचार गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढतच चालले आहेत. हे अत्याचार कमी होताना देखील दिसत नाहीत.

Supriya sule l नराधमांना पब्लिकली फाशी द्यावी :

या धक्कादायक घटनेनंतर पालक आणि बदलापूरमधील नागरिक प्रचंड संतप्त झाले आहेत. कारण आता ते रस्त्यावर देखील उतरले आहेत. सध्या घडत असलेल्या घटना या एकदम धक्कादायक आहेत, तसेच त्यांची विकृती घाणेरडी आहे. तसेच यामध्ये मला राजकारण आणायचं नाही, हा एक सामाजिक विषयच आहे. ही आपली सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे.

अशा विकृत लोकांना एकदा तरी पब्लिकली नक्कीच फाशी द्यावी त्याशिवाय अशा नराधम आरोपींना धडकी भरणार नाही, त्यांना पुन्हा असं वागण्याची भिती देखील वाटली पाहिजे, याशिवाय कुठल्या महिलेकडे पाहताना देखील धडकी भरली पाहिजे, हात लावणं तर गोष्टच दूर… पण पाहताना देखील त्यांनी दहा वेळा विचार केला पाहिजे, असं त्या म्हणाल्या आहेत.

News Title : Supriya Sule Statement On Badlapur School Rape News

महत्वाच्या बातम्या-

…त्या दोन चिमुकल्यांची काय चुक? नराधमाने चिमुकल्यांवर शाळेत केला बलात्कार

जयंत पाटील अजितदादांना लवकरच धक्का देणार? नेमकं काय होणार

‘या’ कारणामुळे खाद्यपदार्थांच्या किमतींमध्ये प्रचंड चढ-उतार!

मृत्यूच्या खोट्या अफवांवर भडकला श्रेयस तळपदे; म्हणाला, “मी जीवंत आहे”

ग्राहक आनंदी! सोनं झालं स्वस्त, रक्षाबंधनानंतर ‘इतके’ घसरले भाव