Top News

खासदार सप्रिया सुळेंचं व्हॉट्सअ‌ॅप स्टेटस पुन्हा चर्चेत!

Loading...

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसच्या खसदार सुप्रिया सुळेचं व्हॉट्सअ‌ॅप स्टेटस पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. सुप्रिया सुळेंनी व्हॉटसअ‌ॅप स्टेटसला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांसोबतचा फोटो ठेवला आहे.

फडणवीसांच्या पाठीवर हात ठेऊन झालेल्या हास्यविनोदाला सुप्रिया सुळेंनी कमेंट केली. लूक हू आय मेट टुडे? असं स्टेटस लिहिलं आहे. सोलापूरचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेण्यासाठी सुप्रिया सुळे बुधवारी विधानभवनात आल्या होत्या.

वळसे पाटील यांची भेट आटोपून त्या परत निघाल्या असता त्यांच्यासमवेत काही इतर महिला पदाधिकारीही होत्या.  तेवढ्यात देवेंद्र फडणवीस यांचे सुरक्षारक्षक महिलांना बाजूला सरा, बाजूला सरा करीत त्यांनी फडणवीस यांना तेथून जाण्यासाठी जागा केली. यावर सुप्रिया सुळेंनी सुरक्षारक्षकांना प्रथम हटकलं.

दरम्यान, उपस्थितांनी हा फोटो काढला होता. मग हा फोटो सुप्रिया सुळेंनी आपल्या व्हॉटअ‌ॅप स्टेटसला ठेवत त्याखाली लूक हू आय मेट टुडे, असं लिहिलंय.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या- 

‘येसूबाईं’ना नाही आवरेना लाठीकाठी खेळण्याचा मोह; पाहा व्हिडीओ

कोरेगाव भीमा प्रकरणातील 348, तर मराठा आंदोलनातील 460 गुन्हे मागे- अनिल देशमुख

महत्वाच्या बातम्या- 

आजकाल शाळा कुणाचंच ऐकत नाहीत पण… – देवेंद्र फडणवीस

गृहमंत्री अमित शहांनी तात्काळ राजीनामा द्यावा- नवाब मलिक

‘अंनिस’नं उचललं मोठं पाऊल; इंदोरीकर महाराजांच्या अडचणी वाढल्या

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या