मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) भाजप प्रवेशावरून चाललेल्या गदारोळाला पूर्णविराम दिल्यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. यावर आता खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी अजित पवारांवर (Ajit Pawar) प्रतिक्रिया दिली आहे.
अजितदादा मंत्रालयात असून माझ्या बिचार्या दादाचं असं झालंय की काहीही झालं तरी माझ्या भावावर त्याचं खापर फोडलं जातं. पण मार्केटमध्ये जे नाणं चालतं. त्याचीच जास्त चर्चा सुरू असते, असं त्या म्हणाल्यात.
मला एक गोष्ट आठवते. ती म्हणजे भूकंप झाला तर तो पवारसाहेबांनी केला. पण त्या भूकंपामध्ये बिचार्या पवारसाहेबांची काय चूक आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात मांडली.
एकूणच आमच्या कोणाच्याही मनात शंका नसून टीव्हीवर ती जास्त वाटत असल्याचं सुप्रिया सुळेंनी यावेळी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या-