देश

अन् भर संसदेत सुप्रिया सुळे म्हणाल्या…’निर्मलाताई, माझ्या दादाकडून अर्थखातं शिका’

नवी दिल्ली | राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना अजित पवारांकडून मार्गदर्शन घेण्याचा सल्ला दिला आहे. त्या संसदेत बोलत होत्या. मोदी सरकारने खासदारांचे 12 कोटी कापल्याच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलंय.

केंद्रीय आणि महाराष्ट्र कॅबिनेटच्या अर्थमंत्र्यांमध्ये एक फरक आहे. केंद्रीय अर्थमंत्री यांनी देशातील प्रत्येक खासदाराकडून बारा कोटी रुपये काढून घेतले, तेही त्यांना न विचारता. त्यांनी परस्पर घेऊन टाकले. आता लोक आम्हाला विचारतात, एमपीलॅड फंड द्या, ते तर मोदीजी घेऊन गेले. कुठून देऊ, अडीच वर्ष तर काहीच करता येणार नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

तुम्ही महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून काहीतरी शिकू शकता. त्यांच्याकडून थोडं मार्गदर्शन घेता येईल. लोकांकडून चांगल्या कल्पना घेणं, ही चांगली गोष्ट असते, असं सुप्रिया सुळे संसदेत म्हणाल्या.

एकाही आमदाराकडून… चारही पक्षांच्या बरं का, हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक आमदाराला, अगदी विरोधीपक्षातीलही आमदारालाही दरवर्षी पाच कोटी रुपये मिळतील, हे आमच्या अर्थमंत्र्यांनी सुनिश्चित केलं. हा भारताचे अर्थमंत्री आणि महाराष्ट्राचे अर्थमंत्री यांच्यातील फरक आहे, असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

राज्यपाल आणि ठाकरे सरकारच्या वादात आठवलेंची उडी, म्हणाले…

पुजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी केली ‘ही’ मोठी मागणी!

राज्यपालांवर ओढवली नामुष्की; फडणवीस म्हणातात, “इगोवालं सरकार!”

राज्यपाल काही फक्त भाजपचे नाहीत ते महाराष्ट्राचेही आहेत- संजय राऊत

रिअल इस्टेट किंग अविनाश भोसलेंवर ‘ED’ची धडक कारवाई, मुलाला मुंबईला नेलं!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या