बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेलारांनी शब्द जरा जपून वापरावेत; सुप्रिया सुळेंचा सल्ला

मुंबई | भाजप नेते आणि माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात एकेरी भाषा वापरत टीका केली. हा कायदा केंद्राचा आहे. कायदा लागू होऊ देणार नाही म्हणजे अरे तुझ्या बापाचं राज्य आहे का?, असा घणाघात आशिष शेलारांनी केला. त्यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी समाचार घेतला आहे.

मुख्यमंत्रीपदाचा मान आपण सर्वांनी ठेवला पाहिजे. मग पक्षातले नेते असो वा विरोधी पक्षातले नेते…. आशिष शेलार यांनी शब्द जरा जपून वापरले पाहिजेत, असा सल्ला सुप्रिया सुळेंनी शेलारांना दिला आहे.

मुंबईतील आझाद मैदानावर मराठा विद्यार्थी आंदोलकांची भेट घेण्यासाठी त्या आल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

दरम्यान, आशिष शेलारांना अशी वक्तव्य करणं शोभत नाही. हातात सत्ता नाही म्हणून भाजप नेते अस्वस्थ आहेत, असा टोला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आशिष शेलारांना लगावला आहे.

ट्रेंडिंग बातम्या- 

खरे सावरकर समजायला अनेक जन्म घ्यावे लागतील- विक्रम गोखले

…तर मी आज मुख्यमंत्री झालो नसतो- उद्धव ठाकरे

महत्वाच्या बातम्या- 

“संजय राऊतांनी घेतलेली मुलाखत म्हणजे ‘अनैसर्गिक आघाडी’चा खुलासा करणारी”

‘आम्ही गुजरातमध्ये बापाचा शोध घेत नाही’; शेलारांच्या वक्तव्याचा आव्हाडांकडून समाचार

मी दोन भावांच्या कात्रीत सापडलो होतो- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More