‘पुण्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर’; सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारकडे केली ‘ही’ मागणी
पुणे | पुण्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. केंद्र सरकारने तातडीने पुणे जिल्ह्याला कोरोना प्रतिबंधक लसींचा साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
अनेक केंद्रावरचा लसींचा साठा संपल्यामुळे हजारो नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावं लागत आहे, ही अत्यंत निराशाजनक बाब आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे लसींच्या पुरवठा करण्याची मागणी केली आहे.
लस उपलब्ध नसल्यामुळे पुणे जिल्ह्यातील 109 लसीकरण केंद्रे आज बंद करावी लागली आहेत. लसीच्या पुरेशा साठ्याअभावी संबंधीत केंद्रांवरील डॉक्टर्स आणि एकूणच आरोग्य यंत्रणा हतबल आहेत. हे निराशावादी चित्र बदलण्यासाठी तातडीने प्रयत्न होण्याची गरज आहे, असं सुळे म्हणाल्यात.
दरम्यान, राज्यात लसींचा तुटवडा असल्याचं सांगितलं जात आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह अनेकांनी केंद्र सरकारला लसींचा पुरवठा करण्याबाबत विनंती केली आहे. लसीच्या पुरवठ्याबाबत दुजाभाव का कशासाठी? राज्यात आज केवळ साडेसात लाख लसीचे डोस पुरवण्यात आले. पण इतर राज्यांना 40 लाखांहून अधिक डोस देण्यात आले आहेत. यात राजकारणाचा मुद्दा नाही. पण ज्या पद्धतीने पुरवठा केला जात आहे ते योग्य नाही. दर आठवड्याला आम्हाला 40 लाख डोसेस द्या त्यापेक्षा अधिक आमची काहीच मागणी नाही, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
भाषण चालू असताना अजित पवारांना चिठ्ठी आली, ‘दादा मास्क काढा’; अजित पवार म्हणाले…
‘…तर राज्य केंद्राच्याच ताब्यात देऊन टाका’; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला टोला
रिमोटवरुन झाली भांडणं अन् आईने रागाच्या भरात स्वतःच्याच चिमुकलीला…
‘या’ गावातील लोक कपडे घालत नाहीत , पर्यटकांना देखील कपडे न घालण्याचा नियम लागू
धोनीनं दिला ‘तो’ सल्ला अन् नटराजनचं नशिबच बदललं
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.