“यांनी पार माझी पोरं सोडली नाहीत…,” भर सभेत सुप्रिया सुळे यांनी सांगितलं असं काही…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Supriya Sule | लोकसभा निवडणूक जवळ येत आहे. यापार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक आपापल्या मतदारसंघामध्ये जात सभा घेताना दिसत आहेत. आपल्या मतदारांना आगामी लोकसभेसाठी विश्वासात घेताना दिसत आहेत. पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर आता शरद पवार गटाला तुतारी चिन्ह मिळालं आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) आता बारामतीच्या ग्रामीण भागात सभा घेताना दिसत आहेत . त्यांनी मागील सव्वा वर्षात झालेला त्रास आणि कुटुंबात कलहाबद्दल त्यांनी मतदारांना सांगायला सुरुवात केली आहे.

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये जात सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सभा घेतली आहे. मी जे सव्वा वर्ष भोगलं ते कोणीही भोगून दाखवावं, असं वक्तव्य सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केलं आहे. यावेळी बोलत असताना पवार कुटुंबातील वारंवार बातम्या टीव्हीवर दिसत असल्याचं सांगितलं आहे. पार माझी पोरंही सोडली नाहीत, माझ्या नवऱ्याला आणि पोरांना प्रसिद्धी आवडत नाही. माझ्या पोरांचा राजकारणाशी काय संबंध? असं म्हणत त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

खंत व्यक्त केली-

“दररोज आमच्या खानदानाबद्दल बोलायचे, आज हे बोलले, ते बोलले ऐकूण फार वाईट वाटायचं. दररोज खानदानाबद्दल लिहायचे. दीड वर्षे झालं आमच्या घरी हेच सुरू आहे. मला भाजपचे नेते भेटले अन् म्हणाले की, काय केलंय तुम्ही पवार कुटुंबाने एक दिवस असा जात नाही तुम्ही टीव्हीवर दिसत नाहीत. आम्ही पॅकेज घेऊन थकलो आणि तुमचं मोफत चालू आहे.”

“पहिल्यासारखं भाषण करूच शकत नाही कारण हल्ली लोकं लगेच रेकॉर्डिंग करतात. मात्र हे सर्व राजकारणात घडत आहे. यासाठी आम्ही राजकारणात आलेलो नाही.” असं म्हणत भोरमधील महाविकास आघाडीच्या बैठकीत त्यांनी आपली भावना व्यक्त केली.

गेल्या काही दिवसांपासून आगामी लोकसभेच्या तोंडावर सुप्रिया सुळे ( Supriya Sule) आणि त्यांच्या कुटुंबाचे काही व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. वेगवेगळ्या गाण्यांचा वापर करत सुप्रिया सुळे यांच्या काही भाषणातील व्हिडीओ क्लिप्स एडीट करत सोशल मीडियावर व्हायरल केल्या जात आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांनी मिश्कील टिप्पणी केली आहे.

सुप्रिया सुळेंची मिश्कील टीका

तुमचा खासदार हा पारदर्शक आयुष्य जगतो. मी 24 तास कुठं काय करतेय, हे माहित असतं, असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.

News Title – Supriya Sule Talk About his Family At Bhor Pune

महत्त्वाच्या बातम्या

लोको पायलट क्रिकेट मॅच पाहत राहिल्याने अपघात; 14 जणांचा मृत्यू, रेल्वे मंत्र्यांचा मोठा खुलासा

किशन-अय्यर वादात गांगुलीची दादा’गिरी’! जय शाहंना दिला मोलाचा सल्ला

भाजपकडून मोठा धक्का, या खासदाराचं नाव यादीत नसल्याने महाराष्ट्रात खळबळ

झालं झिंग झिंग झिंगाट…! रिहानासोबत जान्हवीचे ‘भारी’ ठुमके; अदांवर सारेच फिदा

युझी चहलचा संगीता फोगाटसोबतचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; चाहत्यांनी घेतली शाळा!