महाराष्ट्र मुंबई

“52 लोक शरद पवारांना सोडून गेले, एकही आमदार झाला नाही हा महाराष्ट्राचा इतिहास”

Photo Credit- Facebook/ Supriya Sule & Sharad Pawar

मुंबई | 52 लोक शरद पवारांना सोडून गेले होते. त्यातील एकही आमदार म्हणून निवडून आला नाही हा महाराष्ट्राचा इतिहास आहे, असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळेंनी केलं आहे. त्या नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होत्या. तसेच या मेळाव्यात बोलताना नवी मुंबईत सत्ता परिवर्तन 1 हजार 1 टक्के होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा दावा सुुप्रिया सुळेंनी केला.

पक्षात दीड वर्षांपूर्वी कोण टिकेल, कोण लढेल आणि कोण लढणार नाही अशी परिस्थिती होती. रोज उठून आज कोण पक्षातून गेला याची चिंता असायची आणि कोण पक्ष सोडून गेला नाही की बरं वाटायचं, असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं.

सत्ता येते आणि जाते, सत्ता ही सेवा करण्यासाठी असते, ती पदासाठी नसते, ना लालदिव्यासाठी असते हे लक्षात ठेवा, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

शरद पवार यांना राजकारणात 55 वर्षे झाली. त्यातली 25 वर्ष सत्तेत गेली, तर 25 वर्ष विरोधात गेली. या 55 वर्षात महाराष्ट्रातील जनतेने शरद पवारांना कधी अंतर दिलं नाही. ही गोष्ट राष्ट्रवादी पक्षातील सर्वांनी कुटुंब म्हणून लक्षात ठेवली पाहिजे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्यात.

थोडक्यात बातम्या-

“संजय राठोड सर्व मंत्र्यांच्या संपर्कात, योग्य वेळ येताच माध्यमांसमोर येतील”

मुंबई-पुण्यात कोरोनाच्या रुग्णांची धक्कादायक नोंद, जाणून घ्या आजची आकडेवारी!

कोरोनामुळे ‘या’ शहरात पुन्हा कडक निर्बंध, अंत्यविधीला फक्त 20 जण तर हॉटेल्स…

राष्ट्रवादीचा ‘हा’ आमदार सरकारलाच नडला, गुन्हा दाखल झाला पण शिवजयंती साजरी केलीच!

कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय पण प्रसिद्ध डॉ. तात्याराव लहानेंनी दिली दिलासादायक माहिती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या