बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

यशोमती ठाकूर यांचा अजित पवारांवर गंभीर आरोप, सुप्रिया सुळे म्हणतात…

मुंबई | अर्थमंत्री अजित पवार आम्हाला साथ देत नाहीत, असा आरोप काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केला आहे. या आरोपांवर खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार हे सहकार्य करीत नाहीत असे जरी यशोमती ताई म्हणाले असल्या तरी त्यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नका, असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. त्या मुंबईत माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

बालविकास संगोपन निधीला आणखी पैशाची गरज असेल तर ती नक्कीच पूर्ण केली जाईल. महाविकास आघाडी सरकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बालकांबाबत संवेदनशील आहेतच. त्यामुळे यशोमतीताईंनी केलेली मागणी नक्कीच पूर्ण होईल, असं त्या म्हणाल्यात.

यशोमती ठाकूर यांच्या भाषणाचा विपर्यास केला जातोय, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे त्यांनी काही मागणी केलीय. ते त्यावर विचार करतील, ताईंनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी अनाथ मुलांना निधी दिला आहे, मात्र तरी याबाबत कॅबिनेटमध्ये विचार केला जाईल, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

थोडक्यात बातम्या- 

मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू!

अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाबाबत तालिबान्यांकडून मोठं वक्तव्य; म्हणाले….

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

‘ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट’! भावांचं हे गिफ्ट बहिणींच्या आयुष्यभर राहणार लक्षात, पाहा व्हिडीओ

अफगाणिस्तानमधील वास्तव सांगताना खासदाराच्या डोळ्यात आलं पाणी, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More