औरंगाबाद | राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या युवतीने केलेल्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर ठाकरे सरकारमधील एकाही महिला नेत्यानी प्रतिक्रिया दिली नाही म्हणून टीका होत होती. मात्र अशातच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
या प्रकरणात इतके ट्विस्ट येत आहेत त्यामुळे खरं काय आणि खोटं काय?, हा विषय अतिशय संवोदनशील आहे त्यामुळे मला वाटतं या प्रकरणावर बोलताना सर्वांनी जबाबदारीने बोलायला हवं, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. औरंगाबदमध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
कुठलाही आरोप कोणावर करताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, आरोप कोणत्या व्यक्तिवर होत नाही तर संपुर्ण कुटूंबावर होत असतो. त्या कुटंबात त्यांची मुलंही आहेत. त्यामुळे हे विषय गांभीर्याने आणि संवेदनशीलपणे हाताळावेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
दरम्यान, तक्रार करणारी तरूणी रेणू शर्माने माजी आमदार कृष्णा हेगडे आणि मनसे नेते मनीष धुरी यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.
थोडक्यात बातम्या-
लसीची सुरक्षा आणि प्रभावाची जाणीव करुन देण्यासाठी अदर पुनावालांनी स्वत: घेतली लस; पाहा व्हिडीओ
…नाहीतर मीच पहिली लस घेतली असती- उद्धव ठाकरे
तुम्हालाही ‘हा’ मेसेज आला असेल तर सावधान; तुमचे पैसे चोरीला जाऊ शकतात!
“कमळाच्या फुलातील भुंगा म्हणजे मियाँ औवेसी”
प्रसिद्ध अभिनेत्यावर पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराचे आरोप