‘किमान कोरोना काळात तरी….’; सर्वसामान्यांसाठी सुप्रिया सुळेंनी मोदींकडे केली ‘ही’ मागणी
मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे आणि लोकांचे रोजगार संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे एक मागणी केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.
देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे सर्व व्यवहार जवळपास ठप्प आहेत. अशा परिस्थितीत जनतेची क्रयशक्ती देखील घटली असून अनेक कुटुंबांचे बजेट कोलमडले आहे.या परिस्थितीतही स्वयंपाकाच्या गॅसचे सिलिंडर रु. 800 च्या पार पोहोचले आहे. अनेकांना ही रक्कम परवडत नसल्याने त्यांचे हाल होत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
समाजातील बहुतांश घटक गॅसच्या वाढत्या किंमतीमुळे त्रस्त आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपणास नम्र विनंती आहे की, किमान कोरोना काळात तरी जनतेची आर्थिक स्थिती लक्षात घेता कृपया गॅसच्या किंमती सर्वसामान्यांना परवडतील अशा पद्धतीने कमी करण्याबाबत सकारात्मक विचार करावा, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे.
दरम्यान, यावर अवश्य विचार करुन सर्वसामान्यांना दिलासा द्याल हा विश्वास आहे, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. गेल्या एक वर्षाहून अधिक काळापासून देशभरात करोनाचं थैमान सुरू आहे. या काळात लॉकडाऊन आणि उद्योगधंदे बंद पडल्यामुळे देशावर आर्थिक संकट आहे. याचा सर्वसामान्यांनाही मोठा फटका बसला आहे.
देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे सर्व व्यवहार जवळपास ठप्प आहेत. अशा परिस्थितीत जनतेची क्रयशक्ती देखील घटली असून अनेक कुटुंबांचे बजेट कोलमडले आहे.या परिस्थितीतही स्वयंपाकाच्या गॅसचे सिलिंडर रु. ८०० च्या पार पोहोचले आहे.अनेकांना ही रक्कम परवडत नसल्याने त्यांचे हाल होत आहेत.
— Supriya Sule (@supriya_sule) May 6, 2021
थोडक्यात बातम्या-
औषधांचा काळाबाजार करणार्यांना भर रस्त्यात चोपलं पाहिजे- रितेश देशमुख
चिंताजनक! कोरोनावर मात केल्यानंतर रुग्णांना होतंय ‘हे’ गंभीर इन्फेक्शन
ऑनलाईन संवाद साधताना लॉकडाऊन शब्दच विसरले मुख्यमंत्री, व्हिडीओ व्हायरल
आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाज आक्रमक; 16 मे पासून मोर्चा काढणार
देशाला नव्या पंतप्रधानांची गरज- स्वरा भास्कर
Comments are closed.