Top News

“मोदी साहेब ‘मन की बात’मधून चांगलं बोलतात परंतु कृती काहीच करत नाही”

Photo Credit- Facebook / Narendra Modi Supriya Sule

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात‘मधून देशाला संबोधित करतात. यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. अंबरनाथ येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित केला गेला होता. त्यावेळी बोलताना त्यांनी मोदींवर टीका केली.

‘मन की बात’ मधून एक फोन करा असं मोदी सांगतात परंतु प्रत्यक्षात फोन केल्यावर पंतप्रधान कार्यालयाचा फोन उचलला जात नाही ही वस्तुस्थिती आहे. मोदीसाहेब ‘मन की बात’ मधून किंवा भाषणात चांगलं-चांगलं बोलतात. परंतु कृती काहीच करत नाहीत, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

कोरोना काळात खासदारांचा 12 कोटींचा निधी कापला. आम्ही कोविड काळ होता त्यामुळे हे मान्य केलं मात्र मोदींनी संसदेच्या नव्या इमारतीचं बांधकाम सुरू केलं. पण जर तोच निधी त्यांनी एखाद्या हॉस्पिटल उभारणीसाठी वापरला असता तर आम्हाला चांगलं वाटलं असतं, ज्याची गरज नसताना का हा उपद्व्याप असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला.

दरम्यान, पक्षाच्या अडचणीच्या काळात पक्षासोबत राहिला त्याचा मानसन्मान नक्कीच केला जाईल. राष्ट्रवादीचा झेंडा घेऊन जो एकटा लढत होता त्याचाही मानसन्मान 100 टक्के करणार असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

थोडक्यात बातम्या-

‘या’ भाजप नेत्याला ड्रग्ज घेण्याची सवय, कोलकाता पोलिसांचा खळबळजनक दावा

महिलेनं कोरोनाचा नियम तोडला, पावती फाडण्याऐवजी पोलिसानं किस करुन सोडून दिलं! पाहा व्हिडीओ

पोलिस अधिकाऱ्यांच्या महागड्या गाड्या पाहून अजित पवार म्हणाले…

“अहो, आधी तुमची मानसिकता बदलायला हवी, मग दुसऱ्यांना सल्ला द्या”

अमित शहांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; ‘या’ प्रकरणी न्यायालयाने बजावले समन्स!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या