Top News महाराष्ट्र मुंबई

अमिताभ कांत यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुप्रिया सुळे भडकल्या; म्हणाल्या…

मुंबई | भारतामध्ये अतिलोकशाहीमुळे कठोर सुधारणा करणं कठीण असल्याचं वक्तव्य निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी केलं. अमिताभ यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे भडकल्या.

भारतात लोकशाहीचे कौतुक जास्त होतं हे वरीष्ठ पातळीवरील प्रशासकीय अधिकाऱ्याचे विधान धक्कादायक आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही व्यवस्थेत हे अतिशय बेजबाबदार विधान आहे. त्याचा तीव्र निषेध, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

भारतातील लोकशाही व्यवस्थेचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचंही सुळे यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलं आहे. कठोर सुधारणांशिवाय चीनशी स्पर्धा करणं सोपं नाही, असंही अमिताभ कांत म्हणाले.

दरम्यान, कृषी क्षेत्रात सुधारणांची आवश्यकता आहे. किमान हमीभाव (एमएसपी), बाजार कायम राहणार आहेत हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. कृषी उत्पादनातून फायदा मिळवण्यासाठी विक्रीचे पर्याय शेतकऱ्यांना असणं आवश्यक आहे, असं अमिताभ कांत यांनी म्हटलं होतं.

 

थोडक्यात बातम्या-

भारतीय क्रिकेटपटू पार्थिव पटेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!

कोरोनाबाधित रुग्णाच्या घराबाहेर पोस्टर्स लावू नका- सर्वोच्च न्यायालय

फडणवीस सरकारचा ‘हा’ निर्णयही ठाकरे सरकारने केला रद्द

“मुंबईच्या ‘या’ रुग्णालयात केला जाणार कोरोना लसीकरणाचा पहिला प्रयोग”

पृथ्वीवर एलियन्स लपले आहेत; इस्त्राईलच्या संशोधकाचा खळबळजनक दावा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या